शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी, ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिर आता होणार भव्यदिव्य

By प्रशांत तेलवाडकर | Updated: August 30, 2022 17:28 IST

गणेशोत्सव सुरु करणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी देखील घेतले होते संस्थान गणपतीचे दर्शन.

औरंगाबाद : शहराचे ग्रामदैवत राजाबाजारातील संस्थान गणपती मंदिर आता आकाराने मोठे होणार आहे. विश्वस्तांनी मंदिराच्या बाजूची जागा खरेदी केली असून, आणखी जागा खरेदीचा प्रयत्न सुरु आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर ही गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे.

राजाबाजारातील संस्थान गणपती मंदिर मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. गणेशोत्सव सुरु करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यापासून ते शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंपर्यंत सर्व महान नेत्यांनी येऊन गणपतीचे दर्शन घेतले आहे. याच मंदिरापासून गणेशोत्सवाची सुरुवात, विसर्जन मिरवणूक, गुढीपाडवा शोभायात्रा, महापुरुषांच्या जयंती मिरवणूक याच मंदिरापासून सुरुवात होत असते.

सुमारे साडेतीनशे वर्षे हे मंदिर जुने आहे. १९९४ - १९९५ यावर्षी बजरंगलाल शर्मा अध्यक्ष असताना मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. सुमारे ३५० स्वे. फुटातील संपूर्ण मंदिर संगमरवरी करण्यात आले. २ वर्षांपूर्वी येथे गणेश मूर्तीचे वज्रलेपन करण्यात आले होते. जागा कमी पडत असल्याने संस्थान गणपतीचे रुपांतर भव्य मंदिरात व्हावे, अशी भाविकांची इच्छा होती. त्यानुसार आता विश्वस्त मंडळाने मंदिराच्या डाव्या बाजूची सुमारे १,४०० स्वे. फूट जागा विकत घेतली आहे. पाठीमागील सुमारे १,६०० स्वे. फूट जागा विकत घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ते शक्य झाल्यास येत्या २ ते ३ वर्षात ३,३५० स्वे. फुटांचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थान गणपती मंदिर ट्रस्टचे सचिव प्रफुल्ल मालाणी यांनी दिली.

६० किलो तुरटीपासून संस्थान गणपतीची प्रतिकृतीसंस्थान गणपतीच्या प्रतिकृतीची दरवर्षी गणेशोत्सवात स्थापना करण्यात येते. पूर्वी पीओपीची मूर्ती बसविण्यात येत असे. मात्र, मागील ९ वर्षांपासून शाडू मातीची मूर्ती बसविण्यात येते. यंदा यापुढे एक पाऊल टाकून ६० किलो तुरटीची श्रींची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. यासंदर्भात मूर्तिकार दिनेश बगले यांनी सांगितले की, पहिल्यांदाच तुरटीची मूर्ती तयार करण्यात आली आहे. यात तुरटीचे गरम पाणी करून साच्यात टाकण्यात आले व मूर्ती तयार करण्यात आली. बुधवारी विधीवत या मूर्तीची स्थापना होईल.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGanesh Mahotsavगणेशोत्सव