शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘गोल्डन ट्रँगल’ एक वर्षानंतर

By admin | Updated: May 10, 2016 01:00 IST

विकास राऊत , औरंगाबाद दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी)नंतर औरंगाबाद शहर आणि मराठवाड्याला ‘गोल्डन ट्रान्सपोर्ट ट्रँगल’मध्ये आणण्यासाठी १८ हजार कोटी रुपयांचा

विकास राऊत , औरंगाबाददिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी)नंतर औरंगाबाद शहर आणि मराठवाड्याला ‘गोल्डन ट्रान्सपोर्ट ट्रँगल’मध्ये आणण्यासाठी १८ हजार कोटी रुपयांचा नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोग्राम (एनएचडीपी) तयार करण्यात आला आहे. डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर)नंतर भूसंपादन, अंदाजपत्रके आणि मग कंत्राटदार निश्चिती अशा टप्प्यांतून जाण्यासाठी ‘गोल्डन ट्रँगल’ला कागदावरून जमिनीवर येण्यासाठी १ वर्षाचा काळ लागणार आहे. डिसेंबर २०१५ मध्ये त्या प्रकल्पाच्या भूमिपूजनाची थाटात कोनशिला लावण्यात आली असली तरी ग्राऊंडवर काम सुरू होण्यासाठी काही काळ लागणार असल्याची माहिती नशॅनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या प्रशासकीय सूत्रांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य रस्ते विकास महामंडळ, नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (एनएचएआय) या तीन संस्थांच्या समन्वयाने ती कामे होणार आहेत. सध्या तरी एनएचएआय ही संस्थाच सर्वांसमोर काम करीत असल्याचे दिसते. भूसंपादन मोठा विषय असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाची सर्वात मोठी भूमिका यात आहे; परंतु जिल्हाधिकारी कार्यालय या प्रकल्पाकडे दुर्लक्ष करीत आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग विकासाचा तो कार्यक्रम आहे. आगामी काही वर्षांत डीएमआयसी आणि एनएचडीपीमुळे मराठवाडा आणि औरंगाबाद शहर देशातील महत्त्वाचा विकसित भौगोलिक प्रदेश म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच एवढी मोठी गुंतवणूक दळणवळण सुधारण्यासाठी होत आहे. शहराला ऐतिहासिकेसोबतच ट्रान्स्पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर सिटी म्हणूनही ओळख मिळू शकेल. वाहतूक विकासासाठी ७-फेसचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. आजवर विविध कार्यक्रमांतर्गत रस्ते विकसित करण्यात आले. या नवीन विकास कार्यक्रमाला ‘भारतमाला’ असे नाव देण्यात आले आहे. पूर्वीच्या ७ कार्यक्रमांपैकी ३ टप्पे पूर्ण झाले असून, चौथ्या टप्प्यात औरंगाबाद व सीआरएफ (सेंट्रल रोड फंड वर्क्स)च्या रस्ते विकासाला प्रारंभ होईल. सीआरएफमधील रस्ते राज्य बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात येतील, तर एनएचएआय (नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया) यांच्याकडे एनएचडीपीअंतर्गत निर्माण होणाऱ्या रस्त्यांचे नियंत्रण राहील.जालना रोड सध्या सहापदरी असून, त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. येडशी-औरंगाबाद ते धुळे महामार्गाच्या कामातच ९ कि़मी. अंतराच्या जालना रोडचे काँक्रिटीकरण होणार आहे. या कामात भूसंपादनाचा खोडा निर्माण झाल्याने मुहूर्त केव्हा लागणार हे सांगता येणे शक्य नाही. ४राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ औरंगाबाद शहर चौपदरीकरण येडशी-औरंगाबाद ते धुळे आणि इतर रस्त्यांचे एकत्रित काम करण्यात येणार आहे. जालना रस्ता हा केम्ब्रिज शाळा ते नगर नाका असा १४.५ कि.मी. लांब व ४५ मीटर रुंदीचा दहा पदरी रस्ता व बीड रोडवरील झाल्टा फाटा ते पैठण रोडवरील महानुभाव आश्रम या रस्त्याचेही विस्तारीकरण याच योजनेत होणार असून, हा प्रकल्प ८५० कोटींचा आहे.