शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या साक्षीची गोल्डन कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:34 IST

औरंगाबादची प्रतिभावान अ‍ॅथलिट साक्षी चव्हाण हिने जबरदस्त कामगिरी करीत नवी दिल्ली येथे झालेल्या गेल इंडियातर्फे ‘इंडियन स्पीड स्टार’अंतर्गत अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत पदकांचा डबल धमाका केला. या स्पर्धेत साक्षी चव्हाण हिने मुलींच्या १४ वर्षांखालील वयोगटात २00 मीटर धावण्याच्या शर्यतीत २६ सेकंदांची वेळ नोंदवीत सुवर्णपदक जिंकले.

ठळक मुद्देदिल्लीतील स्पर्धा : पदकांचा केला डबल धमाका

औरंगाबाद : औरंगाबादची प्रतिभावान अ‍ॅथलिट साक्षी चव्हाण हिने जबरदस्त कामगिरी करीत नवी दिल्ली येथे झालेल्या गेल इंडियातर्फे ‘इंडियन स्पीड स्टार’अंतर्गत अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत पदकांचा डबल धमाका केला.या स्पर्धेत साक्षी चव्हाण हिने मुलींच्या १४ वर्षांखालील वयोगटात २00 मीटर धावण्याच्या शर्यतीत २६ सेकंदांची वेळ नोंदवीत सुवर्णपदक जिंकले. त्याचप्रमाणे तिने १00 मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. तिने १२.0७ सेकंदांत हे अंतर पूर्ण केले. साक्षीला भारताचे आॅलिम्पिक पदकविजेते आणि केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.विशेष म्हणजे २0२0 आणि २0२४ आॅलिम्पिकसाठी गेल इंडियातर्फे पूर्ण देशभरात १४ व १६ वर्षांखालील प्रतिभावान खेळाडूंची शोधमोहीम योजनेंतर्गत २९ राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेशातील एकूण दीड लाख खेळाडूंची चाचणी घेण्यात आली होती आणि या चाचणीतून १४ व १६ वर्षांखालील १00 मी., २00 मी. व ४00 मी.साठी प्रत्येक गटातील देशभरातून निवडक फक्त २४ खेळाडू निवडण्यात आले होते. त्याअंतर्गत महाराष्ट्रात नागपूर, नांदेड आणि पुणे येथे या सिलेक्शन ट्रायल झाल्या होत्या. त्यात औरंगाबादच्या साक्षी चव्हाण हिची निवड झाली. साक्षीने आपली निवड सार्थ ठरवत दोन पदकांची लूट करीत आपला विशेष ठसा उमटवला.याआधी रत्नागिरी येथे याचवर्षी १२ जानेवारीला झालेल्या राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतही साक्षी चव्हाण हिने मुलींच्या १४ वर्षांखालील वयोगटात २00 मीटर धावण्याची शर्यत २५.८ सेकंदांत जिंकत सुवर्णपदक जिंकले होते. तसेच १00 मीटर धावण्याच्या शर्यतीत तिने रौप्यपदकाची कमाई केली होती. याच स्पर्धेत ४ बाय १०० मीटर रिलेत तिने ४६.८ सेकंदांची वेळ नोंदवीत महाराष्ट्राला कास्यपदक जिंकून देण्यात निर्णायक योगदान दिले. साक्षी चव्हाण हिने गतवर्षी नागपूर येथील राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत २०० मीटरला सुवर्ण आणि १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. तसेच त्याचवर्षी तिने पुणे येथील सबज्युनिअर स्पर्धेत १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली होती. सातारा परिसरातील न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये शिकत असणारी साक्षी चव्हाण ही क्रीडा प्रबोधिनीची विद्यार्थिनी असून, गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलावर प्रशिक्षक सुरेंद्र मोदी आणि प्रशिक्षिका पूनम नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. या कामगिरीबद्दल तिचे क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे यांनी अभिनंदन केले आहे.