बीड : दसऱ्यानिमित्त बाजारपेठा फुलांनी फुलल्या असल्या तरी पावसाचे कमी प्रमाण व फुलांची आवक करण्यासाठी वाहतूक खर्च वाढल्याने दसरा सणात फुलांना सोन्याचा भाव असल्याचे बाजारपेठेत दिसून आले.नवरात्रौत्सवाच्या शुक्रवारी नवमी आणि दसरा एकाच दिवशी असल्याने बाजारपेठेत भाविकांनी फुले खरेदीसाठी गर्दी केली होती. मात्र सनाच्या मुहुर्तावर फुलांचे दर आकाशाला भिडले होते. सकाळी झेंडुची फुले १०० रु किलो दराने तर गुलाबाची २०० रु किलोप्रमाणे विक्री करण्यात आली. मात्र दुपारी फुलांची मागणी वाढताच शंभर रुपयांहून थेट फुलांचा दर अडीचशे रुपये किलोंवर गेला. सीमोल्लंघन करण्यासाठी लागणारी आपट्याच्या पानांची जुडी १० रुपयेप्रमाणे दोन अशी विक्री करण्यात आली.दसरा सणाचा आनंदोत्सव द्विगुणीत करण्यासाठी देवीच्या पूजेच्या विधीत झेंडुंच्या फुलांचे अनन्यसाधारण महत्व असते. त्यामुळे शहरात शुक्रवारी ठिकठिकाणी फुलांची विक्रीसाठी शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने फुलांच्या लागवडीत कमालीची घट झाली होती. मात्र दसरा सनात देवीचा विधी, शस्त्रांचे पूजन तर व्यवसायिकांनी दुकाने सजावटीसाठी झेंडूच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. जिल्ह्यात फुलांची मोठी लागवड नसल्याने औरंगाबाद, अहमद नगर, नांदेड, पुणे आदी शहरातून गुरवारी रात्रीपासूनच फुलांची आवक होण्यास सुरवात झाली होती. दसऱ्याकरिता शहरातील बाजारसमिती ठिकाणापेक्षा शेतकऱ्यांनीच जागोजागी बसून फुलांची विक्री केली. दसऱ्यानिमित्त बाजारपेठेत जवळपास १५ क्विंटल फुलांची मागणी केली असल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.सकाळी १०० तर दुपारी २५० किलो दरशुक्रवार सकाळी बाजारपेठेत फुलविक्रते दाखल होताच झेंडुच्या फुलांची किमंत १०० रु किलो होती मात्र दुपारी फुलांची मागणीचा जोर वाढतताच शेतकऱ्यांनी संधीचे सोने करित फुलांच्या दरात तीप्पट वाढ केली.फुलांची आवक कमी असल्याने ग्राहकांनी पडेल त्या भावात खरेदी केली. तर दुपारी ४ वा. नंतर बाजारपेठेतील झेंडुची फुलेच गायब झाली. यामुळे मात्र शेतकऱ्यांची ‘चांदी’ झाली.वाहतुकीचा फटका जिल्हा परिसरात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने फुलाची लागडीत कमालीची घट झाली होती. मात्र दसरा सनानिमित्त झेंडुची फुले महत्वाची असल्याने औरंगाबाद, नांदेड, अहमदनगर, पुणे आदी शहरातून फुलांची आवक करावी लागल्याने यंदा फुलांची दरवाढ ही वाहतुकीवर अतिरीक्त खर्च झाल्यानेच झाली आहे.बाजार समितीमध्ये मात्र शुकशुकाटग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी रहद्दारीच्या ठिकाणी फुलांचा बाजार थाटला होता. त्यामुळे ग्राहकांतून ूुले खरेदीसाठी मोठा प्रतिसाद भेटला मात्र शहरातील बाजारसमिती येथे फुलांची कसलिही आवक झाली नाही. तर बाजार समिती परिसरात शुक्रवारी शुकशुकाट दिसत होता. (प्रतिनिधी)
झेंडूच्या फुलांना सोन्याचा भाव
By admin | Updated: October 3, 2014 23:54 IST