शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

राज्य व विभागात प्रथम येणाऱ्या मुला-मुलींचा गौरव

By admin | Updated: March 5, 2015 00:02 IST

लातूर : दहावी व बारावीच्या परीक्षेत राज्यात व बोर्डात प्रथम येणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या गुणवंत मुला-मुलींना वसंतराव नाईक गुणवंत पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.

लातूर : दहावी व बारावीच्या परीक्षेत राज्यात व बोर्डात प्रथम येणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या गुणवंत मुला-मुलींना वसंतराव नाईक गुणवंत पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. राज्यात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख १ लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तर बोर्डात प्रथम येणाऱ्यास प्रत्येकी ५१ हजार, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन या पुरस्काराने गौरविले जाईल. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने गेल्या २५ फेब्रुवारी रोजी हा निर्णय घेतला असून, राज्यस्तरावर दरवर्षी १ जुलै रोजी या पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातून दहावीच्या परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीस प्रत्येकी १ लाख रुपये देऊन सन्मान केला जाईल. २ लाख रुपये या पुरस्कारासाठी खर्च केले जातील. तर बोर्डामध्ये याच प्रवर्गातून प्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीस प्रत्येकी ५१ हजार रुपये असे ८.१६ लाख रुपये पुरस्कारावर खर्च केले जातील. बारावीच्या परीक्षेत विमुक्त जाती व भटक्या जाती प्रवर्गातून राज्यात प्रथम आलेल्या मुला व मुलीस प्रत्येकी १ लाख असे २ लाख तर बोर्डात प्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीस प्रत्येकी ५१ हजार रुपये देऊन पुरस्कार दिला जाईल. असे एकूण ८.१६ लाख रुपये बोर्डातील विद्यार्थ्यांवर खर्च होईल. २०१५-२०१६ या शैक्षणिक वर्षापासून ही योजना अंमलात आली आहे. योजना केवळ विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुला-मुलींसाठी आहे़ (प्रतिनिधी)विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाने पारितोषीक योजना जाहीर केली आहे़ विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या प्रवर्गातून राज्यात प्रथम येणाऱ्या दहावीच्या व बारावीच्या मुलांना व मुलींना प्रत्येकी १ लाख रुपयाचे पारितोषीक गौरवपूर्वक दिले जाणार आहे़ शिवाय, दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत विभागात प्रथम येणाऱ्या मुला-मुलींनाही प्रत्येकी रोख ५१ हजार रुपये या योजनेत पारितोषीक आहे़ उच्च माध्यमिक शिक्षणातील या प्रवर्गातील मुला-मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी ही योजना शासनाने सुरु केली आहे़