पैठण : पाटेगाव येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या धोकादायक इमारतीमध्ये २३० विद्यार्थ्यांवर जीव मुठीत धरून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. पावसाळी वातावरण लक्षात घेता कुठल्याही क्षणी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने गावकऱ्यांना मुलांच्या काळजीने घेरले आहे. इमारत दुरूस्त करा, या मागणीसाठी गावकºयांनी व मुख्याध्यापकांनी पैठण पंचायत समिती प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला. परंतु त्यांच्या मागणीकडे पंचायत समिती प्रशासनाने सपशेल दुर्लक्ष केले आहे.पाटेगावची जि.प. प्राथमिक शाळा ही केंद्रीय शाळा आहे. या शाळेतून १३ जि.प. व ३ खाजगी शाळेचा कारभार चालविला जातो. शाळेची पटसंख्या २३० एवढी आहे. शाळेच्या इमारतीच्या सात वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या आहेत.या वर्गात विद्यार्थ्यांना बसविणे व शिकविणे अत्यंत धोकादायक वाटत असल्याने सर्व २३० विद्यार्थ्यांना (इयत्ता पहिली ते सातवी) उपलब्ध असलेल्या दोन वर्गखोल्यात बसविण्यात येत असल्याचे मुख्याध्यापक डी.डी. थोटे यांनी सांगितले.तक्रारी करुनही दुर्लक्षशैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी याबाबत गावकºयांनी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन शाळेच्या धोकादायक इमारतीच्या दुरूस्तीची मागणी केली होती. मुख्याध्यापकांनीही पंचायत समितीकडे धोकादायक इमारतीबाबत २७ जून व २ जुलै रोजी पत्र देऊन चिंता व्यक्त केली आहे.केंद्रीय कार्यालय याच इमारतीतजवळपास १६ शाळेचा प्रशासकीय कारभार पाटेगावच्या शाळेतून चालविला जातो. सध्या उपलब्ध असलेल्या तीन वर्ग खोल्यांपैकी एका खोलीत केंद्रीय कार्यालय थाटण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी खोल्या नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पाटेगाव हे पैठण येथून केवळ दोन किलोमीटर अंतरावर आहे. या शाळेच्या इमारतीची साधी पाहणी पंचायत समितीच्या एकाही अधिकाºयाने केली नसल्याने गावकरी संतप्त झाले आहेत.
जीव मुठीत धरून २३० विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:19 IST