शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

सोने घेणारांची यादी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:36 IST

मागील दोन वर्षांत ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे सोने खरेदी करणा-या ग्राहकांची यादी आयकर विभागाने शहरातील २५० पेक्षा अधिक ज्वेलर्सला मागितली आहे

प्रशांत तेलवाडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मागील दोन वर्षांत ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे सोने खरेदी करणा-या ग्राहकांची यादी आयकर विभागाने शहरातील २५० पेक्षा अधिक ज्वेलर्सला मागितली आहे. तशा आशयाचे पत्र देण्यात आल्याने आता ज्वेलर्स बिलानुसार ग्राहकांची यादी करीत आहेत. आयकर विभाग या यादीतून आयकरचे विवरणपत्र न भरणा-या ग्राहकांना शोधून त्यांना कर भरण्यासाठी येत्या काळात नोटीस पाठविणार आहे.मागील महिन्याच्या दुसºया पंधरवड्यात आयकर विभागाने शहरातील २५० पेक्षा अधिक लहान-मोठ्या ज्वेलर्सला पत्रे पाठविली आहेत.यात आयकर कायदा १९६१ च्या १३३ (६) या नियमानुसार ज्वेलर्सकडून माहिती मागविण्यात येत आहे. ज्या ग्राहकांनी ५० हजार ते १ लाख ९९ हजार ९९९ रुपयांदरम्यान सोने, दागिने खरेदी केले. तसेच ज्यांनी २ लाखांपेक्षा अधिक रकमेचे सोने खरेदी केले अशा ग्राहकांची यादी मागविण्यात आली आहे. यात वर्षभरात दोन, तीन, चार टप्प्यांत जरी सोने खरेदी केले असेल व त्यांची रोख रक्कम ५० हजारपेक्षा अधिक होत असेल अशा ग्राहकांचे नाव व पत्ता देण्यास सांगितले आहे.मागील दोन वर्षांतील खरेदीदारांची यादी देणे ज्वेलर्सला बंधनकारक आहे. पत्र मिळाल्यापासून महिनाभरात यादी आयकर विभागाला द्यावी लागणार आहे. आयकर अधिकारी विवेककुमार यांच्या सहीने पत्र देण्यात आले आहेत. यामुळे शहरातील प्रत्येक ज्वेलर्स बिलबुकनुसार यादी तयार करण्यास लागला आहे. यादी प्राप्त झाल्यानुसार त्या ग्राहकाचे उत्पन्न व खरेदीचे विश्लेषण करण्यात येईल. तो ग्राहक जर करपात्र असेल पण त्याने आयकर विवरणपत्र दाखल केले नसेल, अशा लोकांना शोधून त्यांना आयकर विभाग नोटीस पाठविणार आहे.