शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

बिले द्या, अन्यथा मनपा प्रांगणातच विष घेऊ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:27 IST

वर्षभरापासून कामांची बिले मिळत नसल्याने कंत्राटदारांच्या संयमाचा बांध बुधवारी फुटला. संतप्त कंत्राटदारांनी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या देऊन विष प्राशन करून मनपा प्रांगणातच आत्महत्या करण्याचा इशारा दिला. तीन दिवसांमध्ये बिलांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही कंत्राटदारांनी केली आहे.

ठळक मुद्देकंत्राटदार मेटाकुटीला : डोक्यावर कर्जाचा डोंगर, कुटुंबाचा उदरनिर्वाह अशक्य

औरंगाबाद : वर्षभरापासून कामांची बिले मिळत नसल्याने कंत्राटदारांच्या संयमाचा बांध बुधवारी फुटला. संतप्त कंत्राटदारांनी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या देऊन विष प्राशन करून मनपा प्रांगणातच आत्महत्या करण्याचा इशारा दिला. तीन दिवसांमध्ये बिलांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही कंत्राटदारांनी केली आहे.काही कंत्राटदारांची बिले एक ते दीड वर्षांपासून अडकलेली आहेत. १५० पेक्षा अधिक छोट्या कंत्राटदारांनी ११५ वॉर्डातील विकासकामे पूर्णपणे बंद केली आहेत. काहींनी कर्ज घेऊन, काही कंत्राटदारांनी उधारीवर कामाचे साहित्य आणले. कर्जबाजारी कंत्राटदारांना सध्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही अवघड झाले आहे. बुधवारी सकाळी सर्व कंत्राटदार एकत्र आले. त्यांनी आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि महापौरांची भेट घेऊन आपले गाºहाणे मांडले. तीन दिवसांमध्ये प्रशासनाने थोडीफार रक्कम प्रत्येक कंत्राटदाराला न दिल्यास प्रांगणातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा इशारा दिला.महापालिका प्रशासन, पदाधिकाºयांनी क्षमतेपेक्षा तीनपट मोठा अर्थसंकल्प तयार करून ठेवला. १८०० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात नगरसेवकांनी कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा समावेश केला. अर्थसंकल्पानुसार अनेक नगरसेवकांनी कोट्यवधी रुपयांची कामेही करून टाकली. त्यामुळे मागील आठ महिन्यांमध्ये लेखा विभागात मंजूर बिलांचा आकडा २०० कोटींवर गेला. यापूर्वी एप्रिल २०१८ मध्ये कंत्राटदारांना बिले देण्यात आली होती. त्यानंतर ४० कोटी, १८ कोटींची बिले वाटप झाली. मागील सहा महिन्यांपासून तर बिलांना पूर्णपणे ब्रेकच लावण्यात आला. ज्येष्ठता यादीनुसार बिले वाटप करण्यात येणार असे वारंवार सांगण्यात आले. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही.दोन कोटींची बिले अदापाणीपुरवठा विभागातील कंत्राटदारांनी २१ जानेवारीपासून कामबंद केले होते. शहरातील जलवाहिनी दुरुस्ती करण्यास कंत्राटदारांनी दोनदा नकार दर्शविला. अधिकाºयांनी कंत्राटदारांची समजूत घालून बिले लवकर दिली जातील, असे आश्वासन देऊन काम करून घेतले. बुधवारी पाणीपुरवठा विभागातील अकरापेक्षा अधिक कंत्राटदारांना २ कोटींची बिले अदा करण्यात आली.ड्रेनेज दुरुस्तीचे कंत्राटदारशहरात चोकअप झालेली ड्रेनेज लाईन दुरुस्ती कंत्राटदारांकडूनच करण्यात येते. दुरुस्तीची बिलेही छोटी असतात. त्यांना प्राधान्याने बिले देण्याचे नियोजन लेखा विभाग, अतिरिक्त आयुक्त करीत आहेत. यानंतर इतर सर्व छोट्या कंत्राटदारांना अंशत: रक्कम देण्यात येणार आहे.--------------

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षा