शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

अपंग भावासोबत मैत्रिणीचे लग्न लावून केला बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2017 23:53 IST

मैत्रिणीला नोकरीचे आमिष दाखवून तिला पळवून नेऊन स्वत:च्या अपंग भावासोबत तिचे लग्न लावल्यानंतर तिच्यावर बलात्कार करणा-या तरुणाला हर्सूल पोलिसांनी

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 27 -  मैत्रिणीला नोकरीचे आमिष दाखवून तिला पळवून नेऊन स्वत:च्या अपंग भावासोबत तिचे लग्न लावल्यानंतर तिच्यावर बलात्कार करणा-या तरुणाला हर्सूल पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात बलात्कार, अपहरण, कट रचणे आणि तरुणीला डांबून ठेवल्याचा गुन्हा नोंदविला आहे. 
जगदीश पंढरीनाथ होंडे (२४, रा. पिंपळळगाव, वैजापूर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीची आई, भाची सोनी मोरे, भाचा मंगेश कोलते आणि भाऊ गणेश खोंडे अशी अन्य आरोपींची नावे असून, त्यांचा शोध सुरू आहे. हर्सूल ठाण्याचे निरीक्षक वसीम हाश्मी यांनी या घटनेविषयी सांगितले की, पीडिता ही म्हसोबानगर येथील रहिवासी आहे. आरोपी एम.ए.चे तर पीडिता बी.ए.मध्ये  शहरातील एका महाविद्यालयात एकत्र शिक्षण घेत असल्याने त्यांची चार वर्षांपूर्वी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. आरोपीने २० फेब्रुवारी रोजी पीडितेला एका शाळेवर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शैक्षणिक कागदपत्रांसह बोलावून घेतले. त्यानंतर भानुदासनगर येथे राहणा-या मीरा बबन कोलते नावाच्या बहिणीच्या घरी तिला चार दिवस डांबून ठेवले. आरोपीचा मोठा भाऊ शंकर हा अपंग असून तो गावाकडे किराणा दुकान चालवितो. शंकरची पत्नी मृत झालेली आहे. आरोपीची आई, भाची सोनी मोरे, भाचा मंगेश कोलते आणि भाऊ गणेश खोंडे यांच्याशी संगनमत करून त्यांनी २४ फेब्रुवारी रोजी जालना येथे आर्य समाज पद्धतीने शंकरसोबत पीडितेचे लग्न लावले. लग्नानंतर पीडिता रडायला लागल्याने तिची समजूत काढून आणतो, असे सांगून जगदीश हा पीडितेला तेथून घेऊन गंगापूर येथे राहणाºया नातेवाईकांच्या शेतवस्तीवर गेला. २४ रोजी रात्री मुक्काम केल्यानंतर दुसºया दिवशी दुपारी वस्तीवरील घरी कोणी नसल्याची संधी साधून जगदीशने पीडितेवर बलात्कार केला. यानंतर तो तिला घेऊन रात्री औरंगाबादेत आला. २५ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास महावीर चौक (बाबा पेट्रोलपंप) परिसरातील एका लॉजमध्ये तिला घेऊन मुक्कामी थांबला. 
 
लॉजमधील रजिस्टरवर पती-पत्नीची नोंद 
लॉजमध्ये थांबण्यापूर्वी तेथील रजिस्टरमध्ये आरोपीने त्याची आणि पीडितेचे पती-पत्नी असे नाते असल्याचे नमूद केले. लॉजवर मुक्कामी असताना मध्यरात्रीनंतर त्याने पुन्हा पीडितेवर अत्याचार केला. दुसºया दिवशी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी आरोपी झोपलेला असल्याची संधी साधून पीडितेने लॉजमधून धूम ठोकली आणि घर गाठले. त्यानंतर आज सकाळी हर्सूल ठाण्यात तक्रार नोंदविली.
 
आरोपीला ठोकल्या बेड्या
तक्रार प्राप्त होताच पोलीस निरीक्षक वसीम हाश्मी, पोलीस उपनिरीक्षक दादाराव बनकर, सहायक उपनिरीक्षक विठ्ठल जवखेडे, उत्तम गिरी आणि कर्मचारी शेख महेबूब यांनी मोठ्या शिताफीने आरोपी जगदीशचा शोध घेऊन त्यास बेड्या ठोकल्या.