शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

मुलीला सलाईन धरायला लावली? सहसंचालक लहाने यांच्याकडून घाटी प्रशासनाची कानउघडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 15:30 IST

तुमच्या लहानशा चुकीने सगळ्या प्रशासनाची बदनामी झाली, याबाबत महाराष्ट्रभर उत्तर द्यावे लागत आहे, अशा शब्दात शुक्रवारी वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी घाटी रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची कानउघडणी केली.

ठळक मुद्देआजारी वडिलांसाठी हातातच सलाईन धरून मुलीला उभे केल्याचे छायाचित्र व्हायरल झाल्याने घाटीतील दयनीय अवस्था समोर आली.वॉर्ड क्रमांक -१९ मध्ये पोहोचल्यावर डॉ. लहाने यांनी लहान मुलीला सलाईन स्टँड धरण्याच्या प्रकारचा समाचार घेतला.

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : साडेसात मिनिटे मुलीला सलाईन धरायला लावली, वरून छोटे स्टँड होते म्हणतात, मंग छोट्या स्टँडवर सलाईन का नाही लावली?, तुमच्या लहानशा चुकीने सगळ्या प्रशासनाची बदनामी झाली, याबाबत महाराष्ट्रभर उत्तर द्यावे लागत आहे, अशा शब्दात शुक्रवारी वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी घाटी रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची कानउघडणी केली. यावेळी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. के. यू. झिने, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सय्यद अश्फाक, डॉ. सरोजनी जाधव, आदी उपस्थित होते.

खुलताबाद तालुक्यातील मौजे भडजी येथील एकनाथ गवळे हे ५ मे रोजी घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. घाटीत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना शस्त्रक्रियागृहातून वॉर्डात नेताना हातात सलाईन धरण्याची वेळ त्यांच्या मुलीवर आली. आजारी वडिलांसाठी हातातच सलाईन धरून मुलीला उभे केल्याचे छायाचित्र व्हायरल झाल्याने घाटीतील दयनीय अवस्था समोर आली. या प्रकाराविषयी माध्यमांमधून वृत्त प्रकाशित झाले. एका बालिकेवर सलाईन बाटली हातात धरण्याची वेळ आल्याचा विषय थेट दिल्लीपर्यंतही गेला. वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसह अनेकांनी जाब विचारला. या अजब कारभाराविषयी राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला.

सर्वांचीच केली कान उघडणी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय विभागाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी शुक्रवारी औरंगाबादेत घाटी रुग्णालयात पाहणी केली.  डॉ. लहाने यांनी विविध विभाग आणि वॉर्डांची पाहणी केली.  विविध सुविधांच्या स्थितीचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी वॉर्ड क्रमांक -१९ मध्ये पोहोचल्यावर डॉ. लहाने यांनी लहान मुलीला सलाईन स्टँड धरण्याच्या प्रकारचा समाचार घेतला. यावेळी अधिकारी - कर्मचाऱ्यांनी सावरा सावर करण्याचा प्रयत्न केला. परंतु डॉ. लहाने यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलेच सुनावले. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे,  डॉ. राहूल पांढरे, डॉ.विकास राठोड  यांची उपस्थित होती.

( घाटीची बदनामी केली म्हणून उपचाराविना रुग्णाला हाकलले )

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीdoctorडॉक्टरmedicinesऔषधं