टेंभूर्णी : जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी येथील सुनीता संतोष सोनसाळे हिने ११ जानेवारी रोजी तिळ्या मुलींना जन्म दिला. आई व तीनही बाळांची प्रकृ ती ठणठणीत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. जालना येथील शासकीय महिला रुग्णालयात ११ जानेवारी रोजी सुनीताबार्इंची प्रसुती झाली. त्यांचा विवाह १५ वर्षीपूर्वी झाला आहे. यापूर्वी त्यांना तीन मुली आहेत. त्यांना पुन्हा एक नव्हे तर तीन मुली झाल्या आहेत. तिन्ही मुलींचे वजन प्रत्येकी ३ किलो असून, आई व मुलींची प्रकृती ठणठणीत आहे. दरम्यान तीन मुली झाल्याने नाराज न होता सोनसळे कुटुंब आनंदी झाले आहे. त्यांनी गावात साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला (वार्ताहर)
टेंभूर्णीतील महिलेने दिला तिळ्या मुलींना जन्म
By admin | Updated: January 15, 2016 00:17 IST