शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वेळेत उपचार घ्या; घाटी रुग्णालयात कोरोनाचे ८० टक्के रुग्ण गंभीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 12:46 IST

वेळेत उपचार घेण्याकडे रुग्णांनी केलेल्या दुर्लक्षाचे गंभीर परिणाम 

ठळक मुद्दे80% घाटीत कोरोनाचे रुग्ण हे स्टेज-४ आणि स्टेज-५ मधील आहेत.२०% रुग्णांत आॅक्सिजन ९०% वर 

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : कोरोनाचे स्वरूप दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वेळीच उपचार घेण्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रकृती गंभीर आणि अतिगंभीर होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. एकट्या घाटीत कोरोनाचे ८० टक्के रुग्ण हे स्टेज-४ आणि स्टेज-५ मधील आहेत. यात स्टेज-५ मधील रुग्णांना वाचविण्याचे आव्हान डॉक्टरांपुढे उभे आहे.

सामान्य व्यक्तीच्या शरीरात ९५ ते ९९ टक्के ऑक्सिजन असतो. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा कमी झाले, तर व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास सुरू होतो. कोरोना प्रादुर्भावाच्या गेल्या ६ महिन्यांत कोरोनाची लागण झालेले, मात्र कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण सुमारे ८० टक्के होते; परंतु आता परिस्थिती उलट झाली आहे. गंभीर  स्वरूपातील रुग्णांचे प्रमाण सध्या अधिक आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला उपचारासाठी कसरत करावी लागत आहे. घाटी रुग्णालयात कोरोनाच्या गंभीर रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे.  यात अनेक गंभीर रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून परत आणण्यात डॉक्टर यशस्वीही होत आहेत. मात्र, कोरोनाच्या अतिगंभीर रुग्णांच्या मृत्यूच्या वाढत्या प्रमाणाविषयी चिंता व्यक्त होत आहे. 

अडीच हजारांवर रुग्णांवर उपचारघाटीत गंभीर रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मंगळवारी दुपारपर्यंत तब्बल ३५१ रुग्ण दाखल होते, तर १४ सप्टेंबरपर्यंत एकूण २ हजार ५६४ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत, तर १ हजार ४१८ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

ऑक्सिजन ४० टक्के, तरीही यशघाटीत दाखल झालेल्या एका रुग्णाची आॅक्सिजन पातळी ४० टक्क्यांपर्यंत खाली आली होती. हा रुग्ण १५ दिवस व्हेंटिलेटरवर होता. उपचारामुळे त्याचे व्हेंटिलेटर काढण्यात यश आल्याचेही डॉक्टरांनी सांगितले. 

कोरोनाचे डॉक्टरांनी सांगितलेले ५ टप्पे स्टेज-१ मधील रुग्ण म्हणजे ज्यांना लागण झाली तरी कोणतीही लक्षणे नाहीत. स्टेज-२ मधील रुग्णांत थोडासा ताप; पण आॅक्सिजनची पातळी सामान्य अशी अवस्था असते.स्टेज-३ मध्ये रुग्णांची प्रकृती मध्यम स्वरूपाची असते. या स्टेजमध्ये २-अ प्रकारात रुग्णांची आॅक्सिजन पातळी ही ९४ ते ९७ टक्क्यांदरम्यान असते, तर २-ब प्रकारात आॅक्सिजनची पातळी ही ९० ते ९४ टक्के असते. स्टेज-४ मध्ये आॅक्सिजन पातळी ९० ते ८८ टक्क्यांदरम्यान असते. त्यामुळे रुग्णाची प्रकृती गंभीर होते. स्टेज-५ मध्ये आॅक्सिजनची पातळी ८८ टक्क्यांपेक्षा अधिक खाली जाते. त्यामुळे रुग्ण अतिगंभीर अवस्थेत जातो.

आजार लपवू नकाकोरोना विषाणू आणि या आजाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही; परंतु अनेक जण आजार अंगावर काढून उपचारासाठी उशिराने दाखल होतात; परंतु कोणत्याही परिस्थिती आजार लपविता कामा नये.  वेळीच उपचार घेतले पाहिजेत.-डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

२०% रुग्णांत आॅक्सिजन ९०% वर ग्रामीण भागासह इतर जिल्ह्यांतून केवळ आॅक्सिजनची गरज असलेले रुग्णही घाटीत येत आहेत. केवळ १५ ते २० टक्के रुग्ण ९० टक्क्यांवर आॅक्सिजन पातळी असलेले रुग्ण दिसून आले. उर्वरित रुग्ण हे स्टेज-४, स्टे-५ मधील आहेत. गंभीर रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण लवकर रुग्णालयात आल्यास गंभीर रुग्णास आॅक्सिजन लवकर देता येतो. गंभीर रुग्णासाठी आॅक्सिजन अधिक फायदेशीर आहे. - डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, मेडिसिन विभागप्रमुख, घाटी. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी