जालना : येथील व्यापारी महेश शिवदास लोया यांचा मारहाणीत गंभीर जखमी होऊन उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या तीनही संशयित आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन मिळाला होता. लोया यांचा मृत्यू झाल्याने भादंवि ३०२ कलम वाढविण्यात आल्याने या गुन्ह्यात अटक करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी लोकमतशी बोलताना दिली. राजेंद्र प्रसाद मार्गावरील रहिवासी व्यापारी महेश लोया यांना ५ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पैशाच्या वादातून झालेल्या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात रूद्रा शिंदे, पुरूषोत्तम शिंदे (रा. पोलिस कॉलनी, रामनगर) व महादेव उखंडे (रा. निधोना) या तिघांविरूद्ध ६ जुलै रोजी गुन्हा दाखल केला होता. महेश लोया यांचा उपचारादरम्यान शनिवारी पहाटे मृत्यू झाल्याने सदर बाजार पोलिसांनी वरील प्रकरणात ३०२ कलमाचा समावेश आहे. संशितांना अटक करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेणार असल्याचे पो. नि. ठोंबरे यांनी सांगितले. (वार्ताहर)आरोपी अटकेसाठी परवानगी घेणार जालना : येथील व्यापारी महेश शिवदास लोया यांचा मारहाणीत गंभीर जखमी होऊन उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मारहाणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या तीनही संशयित आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन मिळाला होता. लोया यांचा मृत्यू झाल्याने भादंवि ३०२ कलम वाढविण्यात आल्याने या गुन्ह्यात अटक करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी लोकमतशी बोलताना दिली. राजेंद्र प्रसाद मार्गावरील रहिवासी व्यापारी महेश लोया यांना ५ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पैशाच्या वादातून झालेल्या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात रूद्रा शिंदे, पुरूषोत्तम शिंदे (रा. पोलिस कॉलनी, रामनगर) व महादेव उखंडे (रा. निधोना) या तिघांविरूद्ध ६ जुलै रोजी गुन्हा दाखल केला होता. महेश लोया यांचा उपचारादरम्यान शनिवारी पहाटे मृत्यू झाल्याने सदर बाजार पोलिसांनी वरील प्रकरणात ३०२ कलमाचा समावेश आहे. संशितांना अटक करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेणार असल्याचे पो. नि. ठोंबरे यांनी सांगितले. (वार्ताहर)दरम्यान मृत्यूपर्वी महेश लोया यांनी मारहाणीची तक्रार दिली होती. त्यात ते पूर्वी ज्या व्यापाऱ्याकडे कामाला होते. त्यांच्या प्लॉट विक्रीच्या पैशावरून वाद झाला होता. त्या व्यापाऱ्याच्या सांगण्यावरूनच मारहाण झाल्याचे लोया यांनी म्हटले होते. विशेष म्हणजे त्या व्यापाऱ्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलिस निरीक्षक ठोंबरे म्हणाले की, त्या व्यापाऱ्यांची चौकशी केल्यानंतरच कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.