शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

सकाळी घराबाहेर पडा, वसुली करा

By admin | Updated: August 20, 2014 01:53 IST

दिनेश गुळवे , बीड एकीकडे जिल्ह्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती असून जिल्ह्यात टंचाई जाहीर करण्यात आली आहे. पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत

दिनेश गुळवे , बीडएकीकडे जिल्ह्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती असून जिल्ह्यात टंचाई जाहीर करण्यात आली आहे. पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर, दुसरीकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेतील अधिकारी, कर्मचारी व शिपायास वसुली करण्यासाठी फतवा काढण्यात आला आहे. गंभीर बाब म्हणजे सुटीच्या दिवशीही वसुली करण्यास व वसुली न केल्यास वेतन न देण्याची ताकीदही देण्यात आली आहे. डीसीसी बॅँकेचे सभासद शेतकरी, विविध संस्था, विद्यार्थी, महिला बचत गट आदींकडे मिळून जवळपास चारशे कोटी रुपयांचे थकित कर्ज आहे. बॅँकेकडे पाचशे कोटींहून अधिक ठेवी असल्याने त्या मिळण्यासाठी ठेवीदार दररोज खेटे घालीत आहेत. गंभीर बाब म्हणजे एनपीए न राखला गेल्यास बॅँकींग परवाना रद्द करण्याचे संकेतही वरिष्ठांनी दिले आहेत. बॅँकिंग परवाना रद्द झाल्यान वसुली व ठेवीदारांच्या पैशांचा मोठा प्रश्न निर्माण होईल, असे होऊ नये म्हणून बॅँकेच्या प्रशासक मंडळाने अधिकारी, कर्मचाऱ्यांसह शिपायांसाठीही आदेश काढला आहे. सकाळी सात ते दहा व सायंकाळी सहा ते आठ या वेळेत वसुलीसाठी घराबाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे बँकेतील दैनंदिन कामकाज करतानाच हे काम करावयाचे आहे. यासाठी सर्वांना दररोजचे उद्दिष्ठही ठरवून दिले आहे. जे अधिकारी, कर्मचारी, शिपाई दिलेले उद्दिष्ठ पूर्ण करणार नाहीत त्याचे वेतन थांबविण्याचेही आदेश बजावण्यात आले आहेत. शिवाय त्यांच्यावर कामात कसूर केल्याबद्दलही कारवाई करण्यात येणार असल्याचे बॅँकेतून सांगण्यात आले. शेतकऱ्यांसह इतरांकडे थकित कर्ज ५९ टक्के आहे, तर बिगर शेती संस्थांकडे शंभर टक्के थकित कर्ज आहे. हे पैसे वसूल करण्यासाठी बॅँकेने कडक भूमिका घेतली आहे. बॅँकेच्या या आदेशाने मात्र, अधिकाऱ्यांसह सर्वच पेचात सापडले आहेत. पाऊस नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी आत्महत्याही केल्या आहेत. अशा परिस्थितीत तगादा लावल्यास व अनुचित प्रकार घडल्यास ‘आपलेच नाव’ पुढे येऊ शकते, अशी भीतीही कर्मचाऱ्यांना आहे. तेव्हा ‘काय करावे?’ असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. आदेशात म्हटले आहे की, सक्तीने वसुली करावी. ही जप्ती ची कारवाई सूर्याेदयानंतर ते सूर्यास्तापर्यंत करावी असेही म्हटले आहे. तसेच थकित पैसे न दिल्यास फौजदारी कारवाई करावी, असेही सुचविले आहे.दरम्यान, असे आदेश असले तरी सध्या टंचाई परिस्थिती असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत बॅँकेच्या भूमिकेवरही शेतकऱ्यांतून रोष व्यक्त होत आहे. दैनंदीन वसुलीचे उद्दीष्टव्यवस्थापक ८०,०००उपव्यवस्थापक ७०,०००स.व्यवस्थापक ६०,०००बँकींग आॅफिसर ५०,०००क.बँकींग आॅफिसर ४०,०००क. सहायक ३०,०००शिपाई १०,०००