शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

२७ लाख पुस्तके प्राप्त

By admin | Updated: June 13, 2014 00:38 IST

नांदेड : सर्वशिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत आतापर्यंत २७ लाख १८ हजार ५४५ पाठ्यपुस्तकांचा पुरवठा गटस्तरावर झाला आहे़

नांदेड : सर्वशिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत आतापर्यंत २७ लाख १८ हजार ५४५ पाठ्यपुस्तकांचा पुरवठा गटस्तरावर झाला आहे़ जिल्ह्यात पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ दिला जातो़ त्याअंतर्गत जिल्ह्यातील ३ लाख ९२ हजार २५३ विद्यार्थ्यांसाठी २२ लाख २१ हजार ४२० पाठ्यपुस्तकांची आणि ७ लाख ८५ हजार ६०६ स्वाध्यायपुस्तिकांची मागणी करण्यात आली होती़ त्यात जिल्ह्यासाठी २१ लाख ३५ हजार ८४३ पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहेत़ तर ५ लाख ८२ हजार ७०२ स्वाध्यायपुस्तिका उपलब्ध झाल्या आहेत़ जिल्ह्यात मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांची संख्या ३ लाख ७४ हजार ५३३ आहे़ तर उर्दू माध्यमाचे १७ हजार २४० विद्यार्थी आहेत़ मॉडेल स्कूलमधील विद्यार्थ्यांनाही मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ मिळणार आहे़ या स्कूलच्या विद्यार्थ्यांची संख्या ४८० आहे़ ही प्राप्त झालेली पाठ्यपुस्तके आणि स्वाध्यायपुस्तिका गटस्तरावर वितरीत करण्याचे कामही पूर्ण झाले आहे़ त्यात नांदेड गटासाठी पाठ्यपुस्तके व स्वाध्यायपुस्तिका असे एकूण १ लाख ५९ हजार २३२ पुस्तके प्राप्त झाली आहेत़ तर अर्धापूर गटासाठी १ लाख २६ हजार ५५, मुदखेड ८६ हजार २०९, लोहा २ लाख २६ हजार १८९, कंधार २ लाख ४६ हजार ५७२, देगलूर २ लाख २ हजार ६४८, नायगाव १ लाख ७९ हजार ५८५, मुखेड ३ लाख १६ हजार ४३८, बिलोली १ लाख १२ हजार ५३, धर्माबाद ९५ हजार ५९१, उमरी ९६ हजार ७३८, भोकर १ लाख ५७ हजार ८३, हदगाव २ लाख ३३ हजार ३००, हिमायतनगर १ लाख १३ हजार १७१, किनवट गटासाठी २ लाख ५९ हजार ४१४ आणि माहूर गटासाठी १ लाख ८ हजार २६७ पाठ्यपुस्तके व स्वाध्यायपुस्तिका प्राप्त झाल्या आहेत़जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी पाठ्यपुस्तके वितरण व वाटपासंदर्भात गटशिक्षणाधिकारी तसेच संबंधितांना सूचना दिल्या आहेत़ (प्रतिनिधी)पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वाटपजिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ देण्यासाठी शिक्षण विभाग सज्ज असल्याची माहिती जि़प़चे शिक्षण व बांधकाम सभापती संजय पाटील कऱ्हाळे यांनी दिली़ शाळेच्या पहिल्याच दिवशी ही पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करण्याच्या सूचना शाळास्तरावर दिल्या आहेत़ या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात येईल असेही कऱ्हाळे यांनी स्पष्ट केले़