शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू भाऊंचे हळवे रूप ! शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांमध्ये रमले; बरोबर उत्तर देणाऱ्यास बक्षीसही दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 19:18 IST

विद्यार्थी कमी का बोलतात, याचा अभ्यास करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना त्यांनी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांना दिल्या.

ठळक मुद्देराज्यमंत्र्यांनी साधला नंद्राबादशाळेत विद्यार्थ्यांशी संवाद

औरंगाबाद ः जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नंद्राबाद (ता.खुलताबाद) येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेला शुक्रवारी दुपारी अडीच वाजता अचानक भेट दिली. यावेळी सातवीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे बरोबर उत्तर दिलेल्या विद्यार्थ्यास त्यांनी खुश होत रोख बक्षीसही दिले. यावेळी पाचवी ते सातवी ३३ पैकी २२ विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. मात्र, विद्यार्थी कमी का बोलतात, याचा अभ्यास करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना त्यांनी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांना दिल्या.

ग्रामीण भागात २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु झाले. विद्यार्थी उपस्थितीची आकडेवारी आणि प्रत्यक्ष स्थिती कडू यांना जाणून घ्यायची होती. यावेळी त्यांनी सरपंच इलियास शेख, शालेय समितीच्या अध्यक्ष आरती भोले यांच्यासह शाळेतील शिक्षकांशी संवाद साधला. १ आॅगस्टपासून गावात समुह पद्धतीने शिक्षण सुरु असल्याचे गावकरी व शिक्षकांनी त्यांना सांगितले. यावेळी शिक्षणाधिकारी जयस्वाल, गटशिक्षणाधिकारी सचिन सोळंकी, विस्तार अधिकारी विलास केवट आदीची उपस्थिती होती.

उत्तरावर खुश झाल्याने दिले विद्यार्थ्याला बक्षीससातवीचा विद्यार्थी सुमित बोडखे या विद्यार्थ्याला कडू यांनी गुरुवारी काय शिकले हे विचारले असता त्याने असे जगावे ही कविता शिकल्याचे सांगितले. त्यावर कडू यांनी त्यातून काय शिकले असे विचारल्यावर आयुष्यात कोणतीही परिस्थिती आली. कितीही संकटे आली तर न घाबरता त्या परिस्थितीला तोंड दिले पाहीजे असे शिकल्याचे सांगितले. त्यावर खुश होऊन कडू यांनी विद्यार्थ्याला रोख बक्षीस दिले.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूEducation Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबाद