शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

भडकलेल्या महागाईत सर्वसामान्यांची होरपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 19:43 IST

घरगुती बजेट कोलमडले 

ठळक मुद्देराजकारण्यांचे सत्तेकडेच लक्ष, भाववाढीकडे दुर्लक्ष मागील वर्षभरापासून महागाई बाजारपेठेत मुक्कामी 

औरंगाबाद : जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ झाली की, त्याचा थेट परिणाम, सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर होत असतो. सध्या हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. महागाई एवढी भडकली आहे की, सर्वसामान्य होरपळून गेला आहे. एकीकडे उत्पन्न वाढत नाही; पण दुसरीकडे खर्च वाढला आहे. भाववाढीवर नियंत्रण ठेवण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्या राजकारण्यांचे सत्ता टिकविण्यातच लक्ष असल्याने भाववाढीच्या विषयाकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. 

करडी तेल २०० रुपये, सोयाबीन तेल १०० रुपये, सूर्यफुल तेल १०२ रुपये प्रतिलिटर, उडीदडाळ १०५ रुपये, मूगडाळ १०२ रुपये, गहू २७ रुपये, ज्वारी ४५ रुपये प्रतिकिलो हे भाव ऐकून सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होत आहेत. शहरात भात खाऊन दिवस काढणाºयांची संख्याही कमी नाही. मात्र, तांदूळही कमीत कमी २८ रुपये किलोने मिळत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच करडी तेलाने २०० रुपयांचा उंबरठा गाठला आहे. गहू, ज्वारी व बाजरीच्या भावानेही यापूर्वीचे भाववाढीचे विक्रम मोडीत काढत नवीन उच्चांक गाठले आहे. 

मागील वर्षभरापासून महागाई बाजारपेठेत मुक्कामी आहे. त्यात मागील दोन महिन्यांतील भाववाढ सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी ठरली आहे. सध्या बाजारात कांदा ४० ते ५० रुपये, तर बटाटा ३५ ते ४० रुपये किलो विकतो आहे. शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट झालेच पाहिजे यात कोणतेही दुमत नाही. मात्र, याचा फायदा शेतकºयांऐवजी मधील दलालांच्या साखळीला होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारी पातळीवर हालचाल होताना दिसत नाही. यामुळे भाववाढ थांबण्याचे नाव घेत नाही. देशातील तेलउद्योगांना उभारी देण्यासाठी व तेलबियांचे क्षेत्र वाढण्यासाठी केंद्र सरकारने क्रूड पामतेलाच्या आयातीवर निर्बंध आणले आहेत. परिणामी, पामतेलासह सर्व खाद्यतेलात तेजी आली आहे. मात्र, २०० रुपये प्रतिलिटरपर्यंत करडी तेल विक्री होणे किंवा सोयाबीन तेलाचे भाव १०० रुपयांपर्यंत जाणे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडणारे नाही. याचाही विचार सरकारने करावा, अशी प्रतिक्रिया जुन्या मोंढ्यात किराणा सामान खरेदीसाठी आलेल्या महिलांनी व्यक्त केली. 

खर्चाचा ताळमेळ लागेना रोजच्या जेवणात काय करावे, हा रोजचाच प्रश्न प्रत्येक महिलेला पडतो. त्यात सध्याच्या परिस्थितीत धान्य व तेलाच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य स्त्रीला तर ठरविलेल्या बजेटमध्ये घर चालविणे खूपच अवघड होऊन बसले आहे. कुठे काटकसर करावी व कु ठे खर्च यांचा ताळमेळ लागत नाही. तुटपुंज्या कमाईत सर्व खर्च भागविणे कठीण होते. बदलत्या काळात सोन्या-चांदीच्या भावाप्रमाणे धान्य आणि तेलाच्या किमतीकडेही लोकांचे लक्ष वेधले जात आहे. - प्राची कापसे

महागाईमुळे तारेवरची कसरतसध्या बाजारपेठेत झालेल्या महागाईने गृहिणी अगदीच हवालदिल झाल्या आहेत. धान्य, डाळी, तेल, दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या वाढलेल्या दरामुळे गृहिणींना घरखर्चाचा मेळ बसविण्यात तारेवरची कसरत करावी लागत आहे. पैशांची बचत कशी करावी, असा प्रश्न आज गृहिणींसमोर आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंमध्ये तरी बेसुमार भाववाढ व्हायला नको.- यामिनी होले

महागाईचा तक्ता 

वस्तू    नोव्हेंबर २०१८  (किलो)    जानेवारी २०१९  (किलो)गहू    २४.५० रुपये ते  ३८ रुपये    २६.५० रुपये ते ३५ रुपयेज्वारी    ३५ रुपये ते ४० रुपये    ४५ ते ५५ रुपये बाजरी    २४ ते २६ रुपये    २६ ते ३० रुपयेतांदूळ    ३० ते ११० रुपये    २८ ते ११० रुपये हरभरा डाळ    ४५ ते ५६ रुपये    ५६ ते ५८ रुपयेतूर डाळ    ८४ ते ८६ रुपये    ७८ ते ८० रुपयेमूग डाळ    ७८ ते ८० रुपय    १०० ते १०२ रुपयेउडीद डाळ    ७८ ते ८० रुपये    ९८ ते १०५ रुपयेमसूर डाळ    ५० ते ६० रुपये    ६० ते ६८ रुपये  मठ     ६० ते ६२ रुपये     ७४ ते ७६ रुपयेरवा    २८ ते ३० रुपये    ३२ ते ३४ रुपयेमैदा    २६ ते २८ रुपये    ३० ते ३२ रुपयेआटा    २८ ते ३० रुपये    ३२ ते ३४ रुपये(पॅकिंगमधील खाद्यतेल, प्रतिलिटर)                    करडी तेल    १६० ते १७० रुपये    १९५ ते २०० रुपयेसोयाबीन तेल    ७८ ते ८० रुपये    ९८ ते १०० रुपयेसूर्यफूल तेल    ८० ते ८५ रुपये    ९८ ते १०२ रुपयेपामतेल    ६८ ते ७२ रुपये    ९४ ते ९६  रुपये

टॅग्स :InflationमहागाईAurangabadऔरंगाबादFamilyपरिवार