शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये ‘गॅस कीट’ची वाहने रडारवर; आरटीओ करणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 17:03 IST

नेवासा (जि. अहमदनगर) तालुक्यातील प्रवरा संगमजवळ सोमवारी मध्यरात्री आॅटोरिक्षाला लागलेल्या आगीत तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर ‘गॅस कीट’असणारी रिक्षा, चारचाकी वाहने आरटीओ कार्यालयाच्या रडारवर आली आहेत.

औरंगाबाद : नेवासा (जि. अहमदनगर) तालुक्यातील प्रवरा संगमजवळ सोमवारी मध्यरात्री आॅटोरिक्षाला लागलेल्या आगीत तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर ‘गॅस कीट’असणारी रिक्षा, चारचाकी वाहने आरटीओ कार्यालयाच्या रडारवर आली आहेत. तपासणी मोहिमेतून ‘गॅस कीट’च्या वाहनांची तपासणी करून त्रुटी आढळून येणार्‍यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

प्रवरा संगमजवळ अज्ञात वाहनाने हूल दिल्याने रिक्षा उलटली. त्यामुळे रिक्षातील एलपीजीचा स्फोट झाल्याचे समजते. अवघ्या काही मिनिटांत रिक्षा जळून खाक झाली. या घटनेमुळे गॅस कीटच्या वाहनांची परिस्थिती समोर आली आहे. पेट्रोल, डिझेलचे वाढते दर आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे, इंधन खर्च कमी व्हावा, यासाठी शासनाने रिक्षा, चारचाकी वाहनांमध्ये एलपीजी (लिक्विड पेट्रोलियम गॅस) वापरास मान्यता दिली. त्यामुळे असंख्य वाहनचालकांनी याचा वापर सुरू केला. या वाहनांसाठी दर पाच वर्षांनी टाकीच्या क्षमतेची तपासणी करणे बंधनकारक आहे. परंतु औरंगाबादला ही सुविधा नसल्याने बहुतांशी वाहने तशीच धावत आहेत. त्यामुळे या वाहनांच्या सुरक्षिततेचा मुद्दा गंभीर बनत आहे.

एलपीजीमुळे काही कालावधीनंतर टाकीची जाडी कमी होते. त्याकडे दुर्लक्ष केल्यास धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यामुळे दर पाच वर्षांनी नागपूर येथील मुख्य स्फोटक नियंत्रक (सीसीई) यांच्याकडून टाकीच्या सुरक्षिततेसंदर्भातील प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असल्याचे आरटीओ कार्यालयाकडून सांगण्यात येते. वाहनचालक हे चाचणी करण्याबाबत उदासीन आहेत. शहरातील सुमारे अडीच हजार रिक्षा आणि जवळपास १८४० चारचाकी वाहने गॅस कीटवर असल्याचे आरटीओ कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. यातील बहुतांश वाहने कोणत्याही तपासणीशिवाय रस्त्यांवर धावत आहेत. आरटीओ कार्यालयातर्फे गॅस कीटच्या वाहनांची तपासणी केली जाईल. प्रमाणपत्र असेल तरच वाहनांचे नूतनीकरण केले जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांनी सांगितले.

...असा होतो धोकाज्या वाहनात गॅस कीटची टाकी बसविली आहे, त्याठिकाणी ब्रेक वायरसारख्या इतर पार्टस्चे अनेकदा घर्षण होते. शिवाय गॅसमुळेही टाकीची जाडी कमी होते. या सगळ्याचा परिणाम म्हणून सिलिंडरची दाब क्षमता कमी होते. अशा वेळी गॅस गळती, स्फोट झाल्यास मोठी जीवित हानी होण्याचा धोका निर्माण होतो. अशा घटना टाळण्यासाठी आरटीओ कार्यालयाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबाद