शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूरची आमसभा गाजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:27 IST

गंगापूर येथील आमसभेत आ. प्रशांत बंब यांनी मागील बैठकीत घेण्यात आलेल्या विषयांचे अनुपालन न करणाºया कामचुकार अधिकारी -कर्मचा-यांची चांगलीच खरडपट्टी केली. कर्तव्यात कसूर करणाºया विविध विभागाच्या दोषी कर्मचा-यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगापूर : गंगापूर येथील आमसभेत आ. प्रशांत बंब यांनी मागील बैठकीत घेण्यात आलेल्या विषयांचे अनुपालन न करणा-या कामचुकार अधिकारी -कर्मचा-यांची चांगलीच खरडपट्टी केली. कर्तव्यात कसूर करणा-या विविध विभागाच्या दोषी कर्मचाºयांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.सोमवारी गंगापूर शहरातील शिवकृपा मंगल कार्यालयात आ. बंब यांच्या अध्यक्षतेखाली आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला पं.स. सभापती ज्योती गायकवाड, उपसभापती संपत छाजेड तहसीलदार चंद्रकांत शेळके, जि.प. सदस्य मधुकर वालतुरे, कृष्णा सुकासे, अप्पासाहेब पाचपुते, गटविकास अधिकारी व्ही.आर.पाटील, नगरसेवक प्रदीप पाटील, भाग्येश गंगवाल, संतोष जाधव, सुमित मुंदडा, शिवप्रसाद अग्रवाल, रामनाथ पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.गटविकास अधिकारी व्ही. आर.पाटील यांनी प्रास्ताविकात आमसभेचा उद्देश व तालुक्यातील कामांची थोडक्यात माहिती दिली. तहसीलदारांनी आरोग्य शिबीर यशस्वी आयोजनाबाबत आमदारांचे अभिनंदन केले व टंचाईबाबत माहिती दिली.गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील रस्ता कामात हलगर्जीपणा करून दर्जाहीन रस्ता तयार केल्याचा ठपका ठेवून आर. जी. फुलारे या ठेकेदाराचे काळ्या यादीत नाव टाकण्याचे आदेश संबंधित यंत्रणेस दिले. यावेळी मागील आमसभेचे अनुपालन व टंचाई बैठक पाणीपुरवठा अनुपालन अहवाल सादर करण्यात आला. कडूबा हिवाळे यांनी मग्रारोहयोअंतर्गत बिले मिळाले नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.महेश लिंगायत लिंगायत यांनी विहिर करण्यासाठी रोजगार हमी योजनेतील अंदाजपत्रकामध्ये क्रेनचे प्रोव्हिजन असणे आवश्यक असल्याची मागणी केली. दहेगावचे सरपंच विक्रम राऊत यांनी मांडलेल्या ठरावास उपस्थितांनी एकमताने मंजुरी दिली. रामनाथ पाटील यांनी विहिरी मंजुरीबाबत अनेक तक्रारी आहेत, त्या तहसीलदारांनी स्वीकाराव्यात अशी मागणी केली.संतोष जाधव व सुमित मुंदडा यांनी तहसील कार्यालयाकडून पंचायत समितीला मुद्रांक शुल्क अनुदान रुपये ५० लक्ष प्राप्त झाले होते. गटविकास अधिकारी यांनी त्यातील ३९ लक्ष रुपये परस्पर कपात करून जिल्हा परिषदेला वर्ग केले असल्याचा प्रश्न उपस्थित केला. यावर बंब यांनी मुद्रांक शुल्काचे पैसे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोणत्या आदेशाने कपात केले याचा खुलासा पंचायत समितीस सादर करावा व पंचायत समितीने ते पत्र संबंधित ग्राम पंचायतीना वितरीत करावेत असे आदेश दिले. योगेश शेळके यांनी उपस्थित केलेल्या महावितरणाची हलगर्जीपणामुळे तुटलेल्या तारांची माहिती देऊनही लाईट सोडल्यामुळे एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. यावर बंब यांनी सदरील प्रकरणात संबधित अभियंता व कर्मचारी हे दोषी आहेत. गुंडाळलेल्या तारांमध्ये विद्युत पुरवठा सोडण्याची ही कृती हेतुपुरस्सर हलगर्जीपणामुळे झालेली आहे. या प्रक्रणाची सखोल चौकशी करून संबधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश बंब यांनी दिले.बैठकीस जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामस्थ आदींची उपस्थिती होती.सकाळी ११ वाजता सुरु झालेली ही आमसभा सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरूच होती. यावेळी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, बांधकाम विभाग, गाय गोठे, एसटी, विद्युत वितरण कंपनी, कृषी विभाग, सिंचन आदी विभागातील विषय चांगलेच गाजले.