शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गंगाखेड शुगर अँड एनर्जी लि. यांच्याविरुद्धच्या गुन्ह्याचा तपास करण्यासंदर्भातील आदेशाच्या पुनर्विचाराचा अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:29 IST

गंगाखेड शुगर अँड एनर्जी लि. यांच्याविरुद्धच्या गुन्ह्याचा तपास करण्यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाचा पुनर्विचार करण्याची विनंती करणारा अर्ज औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी (दि.३) फेटाळला.

औरंगाबाद : गंगाखेड शुगर अँड एनर्जी लि. यांच्याविरुद्धच्या गुन्ह्याचा तपास करण्यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशाचा पुनर्विचार करण्याची विनंती करणारा अर्ज औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी (दि.३) फेटाळला.शेतकरी गिरधर साळुंके आणि इतरांनी खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेनुसार, गंगाखेड शुगर अँड एनर्जी लि. या कारखान्याने १६ ते १७ हजार शेतकऱ्यांच्या नावे सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांचे पीककर्ज उचलून त्याचा अपहार केला असून, यासंदर्भात कारवाईची विनंती करण्यात आली आहे. याचिकेवर सुनावणीत खंडपीठाने २३ जून २०१७ रोजी पोलीस महासंचालकांना आदेश दिले होते की, याप्रकरणी एका ज्येष्ठ आणि कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करून शेतकऱ्यांच्या नावावर उचललेल्या कर्जाची सविस्तर आणि सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते.औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी चौकशी करून, गंगाखेड शुगरने शेतकºयांच्या नावावर कर्ज उचलल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. यावर खंडपीठाने संबंधित आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. असे असतानाही गंगाखेड शुगरच्या वतीने २३ जूनच्या आदेशाचा पुनर्विचार करण्याची विनंती करणारी याचिका दाखल करण्यात आली.दरम्यान चौकशी अधिकाºयांनी गंगाखेड शुगरचे चेअरमन रत्नाकर गुट्टे आणि इतर चार जणांना अटक केली आणि त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्रही दाखल केले. खंडपीठात आज झालेल्या सुनावणीत शेतकºयांच्या वतीने म्हणणे मांडण्यात आले की, या गुन्ह्याची व्याप्ती फार मोठी असताना फक्त पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यात सात बँकांचा अंतर्भाव असताना फक्त दोन बँकांची चौकशी करण्यात आली. सोळा हजार शेतकºयांच्या नावे कर्ज घेतलेले असतानाही फक्त २२ शेतकºयांचे जबाब नोंदविण्यात आले.सुनावणीअंती कारखान्याच्या वतीने दाखल करण्यात आलेला अर्ज खंडपीठाने फेटाळला. या प्रकरणात दाखल आरोपपत्रात गंगाखेड शुगरने ३४९ कोटी रुपयांचा अपहार केला असल्याचे नमूद केलेले असल्याने या अर्जाचा विचार करता येणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले. याप्रकरणी शेतकºयांच्या वतीने अ‍ॅड. प्रल्हाद बचाटे आणि अ‍ॅड. विष्णू मदन पाटील, गंगाखेड शुगरच्या वतीने अ‍ॅड. विजयकुमार सपकाळ तर शासनाच्या वतीने अ‍ॅड. अमरजितसिंह गिरासे यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. ए. आर. काळे यांनी सहकार्य केले. सीबीआय आणि सक्त वसुली संचालनालयातर्फे असिस्टंट सॉलिसिटर जनरल संजीव देशपांडे यांनी काम पाहिले.---------------

टॅग्स :Courtन्यायालयSugar factoryसाखर कारखाने