शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीस्वारांना लुटणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:51 IST

दुचाकीवरुन जाणाºयाला एकटे गाठून चाकूचा धाक दाखवित लुटणाºया टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे़ त्यांच्याकडून ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : दुचाकीवरुन जाणाºयाला एकटे गाठून चाकूचा धाक दाखवित लुटणाºया टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे़ त्यांच्याकडून ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़११ सप्टेंबर रोजी लोहा तालुक्यातील कलंबर येथील शिवपाल मन्नूसिंह ठाकूर हे मित्रासोबत नांदेडहून कलंबरला जात होते़ रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी अडविले़अमच्या अंगावर का थुंकलास असे म्हणून चाकूचा धाक दाखवित ठाकूर व त्यांच्या मित्राला मारहाण केली़ तसेच त्यांच्याजवळील १२ हजार ५०० रुपयांचा मोबाईल लंपास केला़ याप्रकरणी सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़या प्रकरणात सपोनि पांडुरंग भारती यांच्या नेतृत्वाखाली पथकाची स्थापना करण्यात आली होती़ खबºयाकडून मिळालेल्या माहितीवरुन, पोलिसांनी नांदेड शहरातील दत्तनगर भागात राहणाºया नागराज चव्हाण याला पकडले़ त्यानंतर त्याच्या इतर साथीदारांना पकडण्यात आले़आरोपींनी सदर गुन्ह्याची कबुली दिली़ तसेच मंगरुळघाट, माळाकोळी, सिडको, पूर्णा रोड, मालेगांव रोड, वसमत-मालेगाव रोड, भोकर फाटा, बारडरोड, नर्सी-नायगाव आदी ठिकाणी अशाच पद्धतीने दुचाकीस्वारांना लुटल्याचे सांगितले़ त्यांनी दाखविलेल्या घटनास्थळावर पाहणीही करण्यात आली़ पोलिसांनी त्यांच्याकडून २० हजार रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, एक खंजीर असा एकूण ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला़पोलिसांच्या या पथकात सपोनि भारती, पोहेकॉ़ दत्ता वाणी, राजू पांगरेकर, तानाजी येळगे, शेख जावेद, शेख रहेमान, मनोज परदेशी, दादाराव मेश्रामे, बिडगर यांचा समावेश होता़