शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्ड ड्रिंकमधून दारू पाजून चार जणांनी विवाहितेवर केला सामूहिक बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 14:41 IST

वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या विवाहितेला कोल्ड ड्रिंकमधून दारू पाजून चार जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

औरंगाबाद : वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या विवाहितेला कोल्ड ड्रिंकमधून दारू पाजून चार जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. 2 नोव्हेंबला रात्री शहराजवळील टाकळी शिवारात ही घटना घडली आहे. या नराधमांविरोधात चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. यातील अनिल वसंत ठोंबरे या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकुंदवाडी परिसरातील संतोषी मातानगर येथील 22 वर्षीय विवाहिता 2 नोव्हेंबरला रात्री 7 वाजण्याच्या सुमारास घरी एकटीच होती. यावेळी तिच्या ओळखीचा मित्र तेथे आला आणि त्याने त्याचा वाढदिवसाची साजरा करायचा आहे,असे सांगून तिला बाईकवरुन पार्टीसाठी नेले. यानंतर तो तिला घेऊन बीड बायपासमार्गे झाल्टा फाटा येथे गेला. याठिकाणी त्याला त्याचे तीन मित्र भेटले. त्यांच्याजवळ जेवणाचे पार्सल आणि दारूच्या बाटल्या व कोल्ड ड्रिंक होतं. 

यानंतर पीडित महिलेला रस्ताच्या बाजूला उभे करून आरोपी आपापसात चर्चा करू लागले, यानंतर तिला जालना रोडमार्गे शेंद्रा एमआयडीसीजवळील टाकळी शिवारात नेण्यात आले. तेथील एका शेतात ते सर्वजण गेले. तेथे तिच्या मित्राने तिला कोल्ड ड्रिंकमधून दारू पाजली व तेदेखील दारू प्यायले. दारूमुळे पीडितेला गुंगी येऊ लागताच प्रथम मित्राने तिच्यावर बळजबरी करण्यास सुरवात केली. यावेळी पीडितेने त्याचा प्रतिकार केला. तेव्हा सर्वांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने आरडाओरड केली, मात्र एकाने तिचे तोंड दाबून शांत राहण्यासाठी धमकावले.  रात्रीच्या आणि निर्जनस्थळी असल्याने तिचा आवाज कोणापर्यंतही पोहोचला नाही. या चार नराधमांसमोर तिची ताकद कमी पडली. या चारही नराधमांनी आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला. या घटनेमुळे पीडित महिला बेशुद्ध झाली. बेशुद्धावस्थेत आणून टाकले विमानतळासमोरबेशुद्ध झालेल्या पीडितेला आरोपींनी बाईकवरुन चिकलठाणा विमातनळासमोरील एका पेट्रोलपंपाजवळ रात्रीच्या 11 वाजण्याच्या सुमारास आणून टाकले. पंपावरील लोकांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी लगेच या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. एमआयडीसी सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बेशुद्धावस्थेतील पीडितेला घाटी रुग्णालयात दाखल केले व घटना उघडकीस आली.