शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

पर्यावरणाचा ऱ्हास, घेतोय सृष्टीचा घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 19:01 IST

गणेशोत्सवात ज्वलंत विषयावर जनजागृतीची परंपरा कायम

ठळक मुद्देन्यू शिवशक्ती गणेश मित्रमंडळाचा यांत्रिकी देखावा 

औरंगाबाद : निसर्गात होणाऱ्या मानवी हस्तक्षेपामुळे पृथ्वीचे तापमान सरासरीपेक्षा ४.५ अंश सेल्सिअसने वाढले आहे. ध्वनी, वायू, जल व भूप्रदूषणाच्या महाराक्षसाने पृथ्वीवर थैमान घातले आहे. यामुळेच नैसर्गिक आपत्तींना तोंड देता देता मनुष्यप्राणी मेटाकुटीला आला आहे. अशीच परिस्थिती राहिली तर मनुष्याला सर्वत्र आॅक्सिजन मास्क लावून फिरावे लागेल. ही भयावह परिस्थिती टाळणे मनुष्याच्याच हातात आहे. असा संदेश देणारा ‘पर्यावरणाचा ऱ्हास , घेतोय सृष्टीचा घास’ हा यांत्रिकी करामतीवर आधारित देखावा बजाज कंपनीच्या कामगारांच्या न्यू शिवशक्ती गणेश मित्रमंडळाने तयार केला आहे. 

ज्वलंत विषयावर यांत्रिकी करामतीद्वारे सत्य परिस्थितीची जाणीव करून देत शहरवासीयांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा देखावा न्यू शिवशक्ती गणेश मंडळाद्वारे मागील ३५ वर्षांपासून तयार करण्यात येत आहे. जनजागृतीची हीच परंपरा कायम राखत यंदाही खडकेश्वर मैदानावर मंडळाने देखावा तयार केला आहे. एकीकडे महापूर तर दुसरीकडे दुष्काळ. कधी उष्णतेची लाट तर कधी कडाक्याच्या थंडीचा कहर, यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जगामध्ये दरवर्षी ३ लाख २५ हजारांपेक्षा जास्त व्यक्ती मृत्युमुखी पडतात. प्रदूषणामुळे हवामानातील बदल होत असतात आणि प्रदूषण वाढविण्यात मोठी भूमिका आहे ती मानवाचीच. हे दाखविण्यासाठी देखाव्यात पृथ्वी तयार करण्यात आली आहे. सृष्टीचक्र कसे फिरते, हे दाखविण्यात येते. पूर्वी सुजलाम सुफलाम असलेल्या पृथ्वीवर ध्वनी, वायू, जल, भूप्रदूषण एवढे निर्माण झाले की, त्याचे रूपांतर महाराक्षसात झाले. हाच प्रदूषणाचा महाराक्षस आता पृथ्वीलाच गिळंकृत करीत आहे, याची दाहकता देखाव्यात दाखविली आहे. यासाठी चार राक्षसही तयार करण्यात आले आहेत. डीजेच्या कर्कश आवाजाने गाड्याही हलतात, वाहनांचे प्रदूषण दाखविण्यासाठी छोट्या गाड्यांचा वापर देखाव्यात खुबीने केला आहे. प्रदूषणाची नुसतीच दाहकता दाखवली नसून त्यासोबत पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, हेसुद्धा सुचविले आहे. 

या देखाव्याचे उद्घाटन बुधवारी (दि.४) सायंकाळी ७.३० वाजता एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम यांच्या हस्ते होणार आहे. देखाव्याची संकल्पना सुनील नवले यांची आहे. नरेंद्र तायडे, बाबूराव अपार, प्रकाश यादव,  संपत महाडिक, सुनील उपाध्ये, धनंजय कुलकर्णी, मकरंद हवेले, नरेंद्र मराठे, बाबूराव पांचाळ, संदीपान जाधव ही टीम देखावा तयार करीत आहे, अशी माहिती अध्यक्ष गोरख वेळंजकर यांनी दिली.

नागरिकांना देणार शपथपर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी न्यू शिवशक्ती गणेश मित्रमंडळातर्फे ५ मिनिटांचा देखावा संपल्यानंतर शपथ दिली जाणार आहे. निवेदकामागे उपस्थित प्रत्येक आबालवृद्धाला ही शपथ घ्यावी लागणार आहे. या गणेशोत्सवातील जनजागृतीचे हे अभियान एक आदर्श ठरणार आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवAurangabadऔरंगाबादcultureसांस्कृतिक