धर्माबाद: येथील आंध्रा रस्त्यावरील उपविभागीय पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या एक ते दीड कि. मी. अंतरावर शेतात चालत असलेल्या जुगार अड्यावर नांदेडच्या पथकाने धाड टाकली. यात जुगार मटका साहित्यांसह ७ मोटारसायकली, आठ ते बारा लाख रोख रक्कम जप्त केली.एक महिन्यापासून मटका चालू आहे. या ठिकाणी आंध्र प्रदेशातून मटका खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येतात.सदरील माहिती पोलिसांच्या पथकाला मिळताच १२ आॅगस्ट रोजी सायंकाळी सहा ते सातच्या सुमारास धाड टाकली. या धाडीत वीस ते तीस जणांवर जागेवरच कारवाई करण्यात आली. यावेळी जुगार साहित्य, खुर्ची, टेबल, सतरंजी, मोटारसायकली व कार जप्त केली. सदरील धाड पोलिस अधीक्षक परमजित दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रोहित सावंत, जमादार एन. बी. कुंडगीकर, सुरेश शिंदे, सदाशिव आव्हाड आदींनी धाड टाकली. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. (वार्ताहर)
धर्माबादेत जुगार, मटका अड्ड्यावर धाड
By admin | Updated: August 13, 2014 00:45 IST