शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

गायकवाड यांचा यू-टर्न

By admin | Updated: April 29, 2017 23:33 IST

लातूर : मुंबई-लातूर एक्सप्रेस रेल्वेचे बीदरपर्यंत करण्यात आलेल्या विस्तारीकरणाला पाठिंबा दिल्याच्या निषेधार्थ खा़डॉ़ सुनिल गायकवाड व रेल्वे प्रशासनाच्या निषेधार्थ लातूरमध्ये जनांदोलन सुरू आहे़

लातूर : मुंबई-लातूर एक्सप्रेस रेल्वेचे बीदरपर्यंत करण्यात आलेल्या विस्तारीकरणाला पाठिंबा दिल्याच्या निषेधार्थ खा़डॉ़ सुनिल गायकवाड व रेल्वे प्रशासनाच्या निषेधार्थ लातूरमध्ये जनांदोलन सुरू आहे़ या आंदोलना दरम्यान शनिवारी संतप्त कार्यकर्त्यांनी गांधी चौकात त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले़ त्यानंतर खाग़ायकवाड यांनी नरमाईची भूमिका घेत यू-टर्न घेतला आहे़ बीदरपर्यंत गेलेली रेल्वे परत आणण्यासाठी सर्वांच्या पाठिंब्याने प्रयत्न करू, असे खा़सुनिल गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे़ लातूरची रेल्वे लातूरलाच राहण्यासाठी मी आपल्या पाठिंब्याच्या बळावर प्रयत्न करीत आहे़ ही रेल्वे बीदरला जाण्यासाठी मी कोणतेही पत्र दिले नाही़ काहीजण चुकीचा अपप्रचार करीत आहे, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी पत्रकात केले आहे़ मुंबई-लातूर रेल्वे ही लातूरकरांची ओळख आहे़ गेल्या दहा वर्षांपासून लातूर ते मुंबई या मार्गावर दीड पटीने प्रवासी घेवून धावणारी रेल्वे आता बीदरपर्यंत सोडण्यात आली आहे़ त्यामुळे लातूरच्या प्रवाशांवर अन्याय झाला आहे़ हा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यात आला आहे़ या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या भाजपचे खासदार डॉ़सुनिल गायकवाड यांच्यावरही यावेळी कार्यकर्त्यांनी टिका केली़ शिवाय, लातूरकरांची ओळख असलेली रेल्वे बीदरपर्यंत नेण्याचा निर्णय रद्द करावा, यासाठी रेल्वे बचाव कृती समितीच्या आंदोलन तीव्र केले जाणार आहे़ शिवाय, हे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी कृती समितीकडून विशेष मोहिम राबविली जाणार आहे़ कृती समितीच्या वतीने वार्डा-वार्डात सह्यांची मोहिम राबविण्यात येणार आहे़ शिवाय, खासदारांच्या कार्यक्रमावरही बहिष्कार टाकला जाणार आहे़ यावेळी कृती समितीच्या वतीने मुंबई-लातूर रेल्वेचे बीदरपर्यंत करण्यात आलेले विस्तारीकरण रद्द करण्यात यावे, बीदर-कुर्ला, हैद्राबाद-पुणे व नांदेड-कुर्ला ही रेल्वे नियमित सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे़ यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मोईज शेख, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ व्यंकट बेद्रे, महापौर अ‍ॅड़ दिपक सूळ, उदय गवारे, शिवाजी नरहरे, पप्पू कुलकर्णी, अभिजित देशमुख, राजेंद्र बनारसे, एस़आऱ देशमुख, समद पटेल, विक्रांत गोजमगुंडे, अशोक गोविंदपूरकर, बसवंतअप्पा भरडे, रविंद्र जगताप, अ‍ॅड़ मनोहर गोमारे, सिकंदर पटेल, दिनेश गिल्डा, अल्ताफ शेख, अ‍ॅड़ देविदास बोरूळे, प्रदिप गंगणे, व्यंकटेश पूरी, मोहन माने, सुपर्ण जगताप, गोपाळ बुरबुरे, राज क्षिरसागर, प्राचार्य मधुकर मुंडे, शेखर हविले, संजय ओव्हळ, प्रा़ पानगावे, सय्यद रफिक, नगरसेविकास सपनाताई किसवे, अकबर शेख, कैलास कांबळे, सचिन बंडापल्ले, इम्रान सय्यद, आसीफ बागवान, गौरव काथवटे, कांचन अजनीकर, दगडुअप्पा मिटकरी, दत्ता मस्के, प्रविण घोटाळे, रघुनाथ मदने, बालाजी सिंगापुरे, लक्ष्मीबाई बटनपूरकर, भगवान माकणे, युसूफ शेख, मोहम्मद खान, मुबश्शिर टाके आदींसह नागरिकांची उपस्थिती होती़