शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

सर्वात पहिले टँकरची मागणी करणारे गदाणा गाव अखेर झाले टँकरमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 18:11 IST

पाणीटंचाईला कंटाळून ग्रा.पं.पदाधिकारी यांनी दिले होते सामुहिक राजीनामे

ठळक मुद्देदर उन्हाळ्यात तालुक्यात टँकरची पहिली मागणी गदाना गावातून होत असेतालुका प्रशासन व पदाधिकारी यांच्या प्रयत्नांंना यश

- सुनील घोडके

खुलताबाद : बारा महिने पाण्याची टंचाई असलेले गाव म्हणून गदाणा गावाला ओळखत,प्रत्येक उन्हाळ्यात पहिले टँकर गदाणा गावातून सुरू होत असल्याने. गाव टँकरमुक्त करण्यासाठी तालुका प्रशासनाने पंधरा दिवसाच्या अथक परिश्रमानंतर टँकरमुक्त केले व गावास दररोज नळाद्वारे मुबलक पाणी उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थांनी तालुका प्रशासन व पदाधिका-यांचे कौतूक केले आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गदाणा गाव परिसरात कुठेच पाण्याचे स्रोत उपलब्ध नसल्याने गावास कायम पाणीटंचाईचे गाव म्हणून ओळखले जाते.  गदाणा गाव पाणीटंचाईतुन मुक्त होण्यासाठी  सन 2001-2002 साली बाराखेड्याची( तालुक्यातील 12 गावांची पाणीपुरवठा योजना)  पाणीपुरवठा योजना गिरिजा मध्यम प्रकल्पातून कार्यान्वित करण्यात आली पंरतु सतत पडणारा दुष्काळ व कमी पर्जन्यमान त्यातच गदाणा गावच्या विहिरीला कमी लागलेले पाणी .यामुळे या बाराखेडी पाणीपुरवठा योजनेचा गदाणा गावाला म्हणावा तसा फायदा झाला नाही व टँकरग्रस्त गाव म्हणून संपुर्ण तालुक्यात गदाना परिचित झाले.

साधारण डिसेबंर - जानेवारीमध्येच गावाला टँकर सुरू करण्यात यावा म्हणून ग्रामपंचायतीचा प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयास यायचा. प्रस्ताव आल्यानंतर महिनाभर तरी टँकर प्रशासन सुरू करायचे नाही .त्यामुळे गदाणा गावचे ग्रामस्थ  व पदाधिकारी टँकरसाठी रास्ता रोको व इतर आंदोलने करीत असत . त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असत. गेल्या काही दिवसापुर्वी गावच्या  पाणीटंचाईच्या समस्येवरून सरपंच व सदस्यांनी सामुहिक राजीनामा देण्याचे अस्र उचलल्याने परत एकदा गदाणा गाव पाणीटंचाईमुळे चर्चेत आले. खुलताबादचे तहसीलदार राहुल गायकवाड, गटविकास अधिकारी डॉ. द्यानोबा मोकाटे , उपसभापती रेखा प्रकाश चव्हाण यांनी याबाबत ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांना विश्वासात घेवून गदाणा गाव कसे टँकरमुक्त करण्यात येईल यासाठी विचारविनिमय करून गावाची पाणीटंचाई कायमची दूर करण्यासाठी सोबत कामाला लागा म्हणून सांगितले.

अशी मिळाली टँकरमुक्तीतहसीलदार राहुल गायकवाड, गटविकास अधिकारी डॉ. द्यानोबा मोकाटे, उपसभापती रेखा प्रकाश चव्हाण,  सरपंच हौसाबाई भावराव वाहुळ  उपसरपंच द्वारका रोहीदास आधाने  व सदस्य  यांनी येसगाव येथील गिरीजा मध्यम प्रकल्पात पाण्याचे स्रोत शोधण्याचे प्रयत्न केले परंतु ग्रा.पं.ची स्वतःची विहीर किंवा बोअरवेल नव्हते. तालुका प्रशासनाने फुलंब्रीचे गटविकास अधिकारी .डॉ.अशोक दांडगे यांच्याशी संपर्क साधला व किनगाव ता.फुलंब्री ग्रामपंचायतचा गिरिजा प्रकल्पातील बोअरवेल उपसरपंच कल्याण चव्हाण यांच्याशी चर्चा करून तो बोअरवेल गदाना ग्रामपंचायत च्या ताब्यात घेतला.आणि तिथे तात्काळ विद्युत पंप आणि पाईपलाईन टाकून खुलताबाद नगरपालिकेच्या मुख्याधिकारी  ज्योती भगत पाटील , नगराध्य. अँड. एस.एम. कमर, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड यांच्याशी संपर्क साधून 24 तासात विद्युत कनेक्शनची सोय करण्यात आली व बोअरवेलचे पाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेच्या मध्ये टाकण्यात आले सदरील ही योजना सन 2002 ची असून या योजनेची पाईपलाईन दीड दशकापासून बंद असल्याने ती अनेक टिकाणी फुटली असल्याने पाईपलाईन जोडण्यासाठी जवळपास 12 दिवस लागले व रविवार पासून गदाणा गावास मुबलक पाणीपुरवठा सुरू करून गाव टँकरमुक्त करण्यासाठी प्रशासन व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या प्रयत्नाला यश मिळाले. याकामी जि.प.पाणीपुरवठा उपविभागाचे उपअभियंता नंदकुमार अपसिंगेकर , निकम , एमजीपीचे पाटील , तायडे, सरपंच हौसाबाई भावराव वाहुळ , उपसरपंच द्वारका रेहीदास आधाने,सदस्य सुदाम वाघ, अशोक कुकलारे,नवनाथ जाधव, ग्रामविकास अधिकारी संजय खंडागळे, तलाठी आप्पासाहेब सोनवणे,अरूण आधाने , रावसाहेब चौधरी, हरीश्चंद्र चव्हाण , अकुंश चव्हाण, साहेबराव सुरे , चंद्रकांत चव्हाण आदींनी प्रयत्न केले.

गावाला पाणी मिळाले सर्वांचे आभार....तहसीलदार गायकवाड  , गटविकास अधिकारी डॉ. मोकाटे यांच्या कामाप्रती आपुलकी व उत्साह आहे. त्यांनी गावचा पाणी प्रश्न अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने सोडवला.त्याबद्दल त्यांचे मी गदाना ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करते.-हौसाबाई भावराव वाहुळ, सरपंच , गदाणा .

प्रशासनामुळे गावचा पाणीप्रश्न मिटला...गदाना गाव हे टँकरमुक्त करण्यासाठी तालुका प्रशासन व ग्रा.पं.पदाधिकारी यांनी एकदिलाने काम करून गदाणा गाव टँकरमुक्त करून गावचा पाणी प्रश्न मिटविला आहे.सध्या कोरोनामुळे सर्व व्यस्त असतांनाही गदाणाच्या पाणीप्रश्नासाला प्रथम प्राधान्य दिले हे विशेष.-रेखा प्रकाश चव्हाण, उपसभापती पंचायत समिती

सर्व अडथळे दूर केलेयेथे अनेक वर्षापासून पाणीटंचाई होती, दरवर्षी गावाला टँकर सुरू करावेे लागत असे. नेमकी टंचाईचे कारण काय याबाबत तहसीलदार राहुल गायकवाड व आम्ही माहिती घेतली. यानंतर सर्व अडथळे दूर करत गदाणा गाव टँकरमुक्त केले. आगामी काळात खुलताबाद तालुका टँकरमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. - डॉ. द्यानोबा मोकाटे, गटविकास अधिकारी 

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबादpanchayat samitiपंचायत समिती