शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
3
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
4
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
5
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
6
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
7
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
8
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
9
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
10
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
11
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
12
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
14
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
15
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
16
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
17
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
18
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
19
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
20
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका

G20 Summit: बाय ॲण्ड थँक्स लॉट...छत्रपती संभाजीनगर; महिला प्रतिनिधींनी मानले आभार

By विकास राऊत | Updated: March 2, 2023 14:03 IST

जी-२० बैठकीसाठी आलेल्या महिला शिष्टमंडळातील प्रतिनिधीचे कौतुकास्पद आदरातिथ्य प्रशासनाने केले होते.

छत्रपती संभाजीनगर: जी-२० च्या अंतर्गत वूमन-२० या दोन दिवसीय परिषेदसाठी आलेल्या परदेशी महिला प्रतिनिधींनी बाय... बाय... ॲण्ड थँक्स लॉट... छत्रपती संभाजीनगर, असे बोलून त्यांनी १ मार्च रोजी शहराचा निरोप घेतला. २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या विमानाने १६ महिला प्रतिनिधींना जिल्हा प्रशासनाने निरोप देण्यात आला. १ मार्च रोजी उर्वरित प्रतिनिधींनी सकाळपासून वेगवेगळ्या वेळांतील विमानाने प्रस्थान केले.

चैर्ली मिलर, गॅल्याडीस नायर, शाझिया खान, तविशी सिंग, समंथा जान, लिंडा लॉरा शब्दानी, दीपा अहलुवालिया, फ्रान्सिस तोरनेअरी, ॲमू सॅन्याल, हॅरियाना हुताबरत, शमिका रावी, सोलडॅड हेरिरॉवो, गायत्री वासुदेवन या प्रतिनिधींनी २८ रोजी प्रस्थान केले. तर १ मार्च रोजी सुशेन जान फर्ग्युसन, कांता सिंग, जयन मेहता, नीता इनामदार, स्वामीनाथन, वेरीना दी तिमारा, फराह अरब, इस्तानी सुरानो, ऍनी ॲन्जीलिया, क्रिस्तान्ती, नरिनी बोल्हर, इशिता, कार्लो सोल्डाटीनी, स्टिफानो डी टरगीला, कॅर्थिना मिलर, इल्विरा मारास्को, शेविम किया, मधुसेन लक्ष्मी व्ही.टी., जानाभी फोकन, केलसे हॅरिस, सुहाभी, निधी गुप्ता, पूर्वी ठक्कर, ज्यलियन रोझीन, आयेशा अख्तर यांच्यासह इतर महिला प्रतिनिधींनी शहराचा निरोप घेत प्रशासकीय यंत्रणेचे आभार मानले.

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जि.प. सीईओ डॉ.विकास मीना, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनात विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान यामध्ये राहिले. विमानतळावर आगमन आणि पाहुण्याचे निरोप सुरळीत व्हावे, यासाठी विमानतळ प्रबंधक डी.जी. साळवे यांची टीम तसेच स्वागत समितीतील सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, तहसीलदार ज्योती पवार, विजय चव्हाण, एसडीएम रामेश्वर रोडगे, विक्रम राजपूत व महसूल प्रशासनाच्या टीमने परिषदेसाठी अलेल्या पाहुण्यांना आज निरोप दिला.

कौतुकास्पद आदरातिथ्य...जी-२० बैठकीसाठी आलेल्या महिला शिष्टमंडळातील प्रतिनिधीचे कौतुकास्पद आदरातिथ्य प्रशासनाने केले होते. महाराष्ट्रीय पारंपरिक पद्धतीने पाहुण्यांचे स्वागत आणि निरोप देण्यात आला. संगीतमय वातावरणात, लेझीमच्या तालात पुष्पहार, पैठणी, शेले देऊन केलेल्या स्वागत अप्रतिम असल्याचे गौरवोद्गार पाहुण्यांनी काढले. जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणविषयी परिषदा व चर्चासत्राबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम, मेजवानीसह शहरातील पर्यटनस्थळ पाहणीचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक शासकीय विभागाने नेमून दिलेल्या जबाबदारीने पाहुण्याची काळजी घेतली गेली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद