किशोरसिंह चौहाण, मुखेडमुखेड विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढतीची चिन्हे आहेत. विद्यमान आ. हणमंत पाटील बेटमोगरेकर यांना काँग्रेसमधूनच होणारा अंतर्गत विरोध, गटबाजी व आघाडीतील सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी चूल यामुळे येणारी विधानसभा तितकी सोपी नाही़ आता उरल्या-सुरल्या काही महिन्यात किती आणि कसे डॅमेज कंट्रोल होते यावर पुढे भविष्य सांगता येईल़ आ. बेटमोगरेकर यांच्यासह राठोडबंधू (महायुती), माजी आ. सुभाष साबणे (शिवसेना), जि. प. सदस्य दशरथ लोहबंदे (रिपब्लिकन सेना), व्यंकटराव पाटील चांडोळकर (भाजप), राष्ट्रवादीकडून डॉ. व्यंकट भोसले यांनीही निवडणुकीची तयारी चालविली आहे. मुखेड मतदारसंघ सलग चाळीस वर्षे अनुसूचित जातीसाठी राखीव होता. सलग दहा वर्षे शिवसेनेच्या तिकीटावर सुभाष साबणे यांनी भगवा फडकावित काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळीचा फायदा उचलला होता.२००९ च्या निवडणुकीत खुल्या प्रवर्गातून हणमंत पाटील बेटमोगरेकर यांचा विजय झाला. उमेदवारी मिळविण्याकामी बेटमोगरेकर यांनी राठोड, घाटे, गोजेगावकर, चव्हाण या राजकीय विरोधकांना मागे टाकले. आता यावेळी गोविंदराव राठोड यांनी बेटमोगरेकर विरोधकांची ‘मोट’ बांधत बंडखोरी केली. परंतु तत्कालिन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावर प्रेम करणाऱ्या मतदारांनी बेटमोगरेकरांची नाव तारली. मागील पाच वर्षांत आ. बेटमोगरेकर, जि.प. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी राठोड बंधूंचे काँग्रेसमध्ये पुनर्वसन होऊ दिले नाही.राठोड बंधूंना काँग्रेसमध्ये आणण्याचे प्रयत्न अयशस्वी झाले. आमदारकी व जि. प. अध्यक्षपदाच्या बळावर मतदारसंघात रस्ते, पाणी, बंधारे, तलाव, धार्मिक स्थळांचे पुनर्वसन आदी कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च झाला. तालुक्यातील १३० गावांत मनरेगाची कामे हाती घेण्यात आली. परंतु सरपंच, ग्रामसेवकांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरुन या योजनेत मोठा गैरव्यवहार केला. या गैरव्यवहार प्रकरणात १७ ग्रामपंचायतींविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने गुन्हे दाखल झाले. हा गैरव्यवहार राज्यात गाजला. यातील नाराजीचा फटका या निवडणुकीत बसण्याची चिन्हे आहेत. विरोधकांची तयार झालेली फळी, मनरेगातील गैरव्यवहार आणि ‘एकला चलो’ या भूमिकेमुळे आ. बेटमोगरेकरांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. व्यंकट भोसले यांनीही तयारी सुरु केल्यामुळे बेटमोगरेकरांच्या विरोधकांत भर पडली आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाला ११ हजार ३०० चे मताधिक्य मिळाले. या बळावरच विरोधकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपब्लिकन सेना, महायुती यासह काही अपक्ष अशी निवडणूक गाजण्याची चिन्हे आहेत. खरी लढत काँग्रेस विरुद्ध महायुती अशी होईल. जि. प. गट व पं. स. गण हे काँग्रेसच्या ताब्यात असून मुखेड पालिकेवर शिवसेना-भाजपाचे वर्चस्व असल्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची व निर्णायक स्वरुपाची होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनावसंत संबुटवाड१५५०८अपक्ष गोविंद राठोड६४, ७९७ कॉंग्रेसहणमंत पाटील बेटमोगरेकर६६०१३इच्छुकांचे नाव पक्षहणमंत पाटील काँग्रेस गोविंदराव राठोड भाजपासुभाष साबणे शिवसेनाडॉ. व्यंकट भोसले राष्ट्रवादीलोकसभा निवडणुकीत डी.बी. पाटील (भाजपा) यांना ११ हजार ३०० एवढे मताधिक्य
'डॅमेज कंट्रोल'वर बेटमोगरेकरांचे भवितव्य
By admin | Updated: June 12, 2014 00:20 IST