वसमत/हट्टा : वसमत तालुक्यातील हट्टा येथे शुक्रवारी झालेल्या स्फोटात चार जण ठार झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. घटनेत ठार झालेल्या चारही जणांवर शुक्रवारी सायंकाळी एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी हट्टा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेने हट्टा गावावर शोककळा पसरली आहे. हट्टा येथे घडलेल्या घटनेत गुलाबखान पठाण, रहीम गुलाबखा पठाण, अजीम रहीमखान पठाण व शेख अतीख शेख ईसाक हे चौघे ठार झाले आहेत. एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचे या घटनेत निधन झाले आहे. सायंकाळी साडेसात वाजता मयतांवर हट्टा येथील कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच वेळी चारही मयतांची जनाजा नमाज अदा करण्यात आली. अंत्यविधीसाठी हजारोंच्या संख्येने सर्व स्तरातील ग्रामस्थ हजर होते. दिवसभर हट्टा ग्रामस्थांनी बंद पाळून शोक व्यक्त केला. तसेच परभणी येथे मयत तिघांचे शवविच्छेदन होणार असल्याने त्याची माहिती घेतली जात होती. जखमीलाही नांदेडला हलविण्यात येणार असल्याने ग्रामस्थ त्याची वारंवार विचारणा करताना दिसत होते. या घटनेमुळे तालुकाभर हळहळ व शोक व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
शोकाकूल वातावरणात चौघांवर अंत्यसंस्कार
By admin | Updated: March 19, 2016 20:17 IST