शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

निधी,पाण्याचा तुटवडा

By admin | Updated: July 24, 2014 00:27 IST

कंधार : महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलित वस्ती पाणीपुरवठा व स्वच्छता योजना पूर्ण होण्यास मोठा गतिरोध निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे.

कंधार : महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलित वस्ती पाणीपुरवठा व स्वच्छता योजना पूर्ण होण्यास मोठा गतिरोध निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. निधीचा तुटवडा अन् अपुरा जलसाठा आदीमुळे अनुसूचित जातीच्या कुटुंबांना याचा फटका सहन करण्याचा प्रसंग जिल्हाभर ओढवल्याचे समजते.जिल्ह्यातील या योजनेची माहिती समोर आली आहे. १४८ ग्रामपंचायतींतील ८ हजार ४५३ अनु. जातीतील कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. त्यात पाणी जोडणीसाठी १२३० कुटुंबांना मिळणार असे दिसून आले. परंतु सर्वच कामे प्रगतीपथावर असल्याचा अहवाल समोर आला. महिन्यात थोडीशी पूर्ण कामे झाली असतील, परंतु बहुतांशी कामे अपूर्ण असल्याचे समजते. योजनेवर जिल्ह्यात २३ लाख ३७ हजार खर्च झाला.वैयक्तिक शौचालय बांधकामाची अवस्थासुद्धा जवळपास कमी-अधिक प्रमाणात तशीच आहे. ८ हजार ४५३ पैकी अवघे २ हजार ९५ कामे पूर्ण झाली परंतु ६ हजार ३५८ कामे अर्धवट होते. यात महिन्यातही फारसा फरक पडला नसल्याचे सूत्रांकडून समजते. अर्धापूर तालुक्यातील २३ पैकी १६ कामे पूर्ण ७ प्रगतीपथावर, किनवटमध्ये ४१९ पैकी १२८ पूर्ण, नायगाव ८३४ पैकी २१३ कामे पूर्ण, माहूर २४ पैकी ६, देगलूर- १९७२ पैकी ४७५, मुखेड- ९१९ पैकी ३४५, हदगाव ६५२ पैकी १०७, मुदखेड- ३८८ पैकी ६३, धर्माबाद ६१२ पैकी ६३, शौचालये बांधकाम पूर्ण झाले. बिलोली २२०, हिमायतनगर १४६, लोहा ७९ आणि उमरी तालुक्यातील ५४ मंजूर कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती आहे. त्यात फारसा फरक आता पडला नाही. थोडीशी कामे कदाचित पूर्ण झाली असतील.कंधार तालुक्यातील पा.पु. ३३१ कामे प्रगतीपथावर होते. १५ ग्रामपंचायती अंतर्गत १८७७ अनु. जाती मधील कुटुंबांना शौचालय बांधकामांना मंजुरी मिळाली. त्यातील ६५९ कामे पूर्ण झाली. परंतु १२१८ कामे ही प्रगतीपथावर असल्याची माहिती आहे. चिखलभोसी २५, लालवाडी १२, देवयाचीवाडी २४ या गावात आपले उद्दिष्ट पूर्ण केली. परंतु पानभोसी २५२, शेकापूर १७७, बहाद्दरपुरा ९१, दिग्रस बु. ११०, कुरुळा- २०६, घोडज १५३, शिरुर ७५, हरबळ ५४, गुंटूर ७८, शिराढोण २०७, वरवंट ६३ आणि आंबुलगा २७० कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. त्यात यश आले नाही. कामे खोळंबण्यास निधीचा तुटवडा असल्याचे प्रमुख कारण आहे. अनुसूचित जातीतील लाभार्थी कुटुंबांना मंजुरी मिळाल्यानंतर आनंद झाला. कामे पूर्ण होऊन वापर करता आला असता तर अधिक आनंद झाला असता. कामे पूर्ण करण्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)