शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

फुलंब्रीत नगर पंचायत निवडणुकीत चढला ज्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 01:38 IST

फुलंब्री येथील नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून मतदानाला दहा दिवस उरले असताना नगराध्यक्षासह सर्वच नगरसेवकपदाच्या उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कफुलंब्री : येथील नगर पंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून मतदानाला दहा दिवस उरले असताना नगराध्यक्षासह सर्वच नगरसेवकपदाच्या उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. या निवडणुकीत आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांना प्राधान्य देण्यात आल्याने हे उमेदवार मतदान ‘पक्के’ करण्यासाठी नवीन युक्त्या शोधत आहेत.१३ डिसेंबर रोजी मतदान होणार असून या निवडणुकीत दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत आहे. एकीकडे भाजपने स्वतंत्र पॅनल उभे केले तर दुसरीकडे त्यांना मात देण्यासाठी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन शहर विकास आघाडी तयार केली. गेल्या पंधरा वर्षात शहराचा विकास थांबलेला असल्याने तिन्ही पक्षाला एकत्र येणे आवश्यक झाले असल्याचा सूर नागरिकांमधून निघत आहे.प्रचाराला केवळ नऊ दिवसाचा कालावधी राहिल्याने प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने कामाला लागला आहे. मतदान होईपर्यंत वार्ड सोडायचा नाही, अशा प्रकारचा चंग त्यांनी बांधला आहे. दोन्ही पॅनलकडून उमेदवारांची निवड करताना चाचपणी करण्यात आली.यात आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या प्राधान्य देण्यात आले. मोजके पाच ते सहा उमेदवार सोडले तर बाकीचे सर्वच उमेदवार ‘धनको’ आहेत. त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार रंगला नाही तर नवलच म्हणावे लागेल.भोंग्याचा आवाजाने नागरिक त्रस्तया निवडणुकीत दोन उमेदवार नगराध्यक्षपदासाठी व ४५ उमेदवार नगरसेवकपदासाठी रिंगणात आहेत. प्रत्येक जण प्रत्येक वार्डात चारचाकी वाहनावर लाऊडस्पीकर लावून प्रचार करीत आहे.कर्कश आवाजाने नागरिक त्रस्त झाले आहेत. लाऊडस्पीकरचा आवाज कमी ठेवावा, अशी अपेक्षा नागरिकांची आहे.इव्हीएम मशीनबाबत वावड्यागेल्या अनेक निवडणुकीत मतदान एकाला करताना ते दुसºयाला पडले, अशा प्रकारच्या बातम्या टीव्हीवर बघायला मिळतात. त्यामुळे या निवडणुकीत असे होते की काय, अशा प्रकारच्या वावड्या उठत आहेत. याबाबत हॉटेलवर चर्चा होताना दिसत आहे.