शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव टँकरने दुचाकीस्वाराला चिरडले, सिग्नल न पाळल्याने बेतले जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 16:55 IST

पिवळ्या सिग्नलमध्येच पुढे जाण्याच्या घाई एका दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरली. देवळाईकडून शिवाजीनगरकडे जाण्यासाठी घाईत रस्ता ओलांडणा-या दुचाकीस्वाराला सुसाट निघालेल्या आॅईलच्या टँकरने चिरडले. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचालकाच्या डोक्यावरून टँकरचे चाक गेल्यानंतर तो जागीच ठार झाला.

औरंगाबाद, दि. ८ : पिवळ्या सिग्नलमध्येच पुढे जाण्याच्या घाई एका दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरली. देवळाईकडून शिवाजीनगरकडे जाण्यासाठी घाईत रस्ता ओलांडणा-या दुचाकीस्वाराला सुसाट निघालेल्या आॅईलच्या टँकरने चिरडले. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचालकाच्या डोक्यावरून टँकरचे चाक गेल्यानंतर तो जागीच ठार झाला. ही घटना आज दुपारी १.२० वाजेच्या सुमारास देवळाई चौकात घडली.

दिलीप विठ्ठलराव गलधर(वय ५०,रा. घारेगाव, ता. औरंगाबाद)असे मृताचे नाव आहे. याविषयी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत दिलीप गलधर हे रविवारी दुपारी देवळाईकडून शहराकडे मोटारसायकलने (एमएच-२०बीएन १७६२)जात होते. दुपारी १.२० वाजेच्या सुमारास देवळाई चौकातील वाहतुक दिवा ग्रीनवरून पिवळा झाला. यावेळी गलधर हे वेगात निघाले. त्याचवेळी झाल्टा फाट्याकडून महानुभाव आश्रम चौकीकडे निघालेल्या टँकरसह अन्य वाहने (एमएच-२०डीई ७०७२) पुढे जाण्यासाठी वेगात निघाले. अर्ध्या रस्त्यावर आलेले असताना एका ट्रकचालकाने त्यांना वाचविले मात्र पुढच्या टँकरने त्यांना चिरडले. 

या भीषण घटनेत गलधर यांच्या डोक्यावरील हेल्मेटचा चुरडा होऊन त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. यातच टॅँकरचालकाने त्यांना सुमारे आठ ते दहा फुट फरपटत नेले. यामुळे गलधर हे जागीच ठार झाले.अपघाताची माहिती मिळताच देवळाई चौकीतील पोहेकॉ एन.के. ब-हाटे, सातारा ठाण्याचे चार्ली पोलीस, वाहतूक शाखेचे सुरेश तारो, ज्ञानदेव डिघुळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांची गाडी आणि अ‍ॅम्ब्युलन्स बोलविण्यात आली.  मात्र तत्पूर्वीच लोकांनी गलधर यांना घटनास्थळावरून रुग्णालयातून हलविले. याप्रकरणी सातारा ठाण्यात नोंद करण्यात आली.