शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
5
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
6
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
7
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
8
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
9
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
10
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
11
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
12
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
13
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
14
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
15
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
16
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
17
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
18
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
19
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
20
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...

मोर्चेबांधणी

By admin | Updated: July 8, 2014 01:00 IST

उस्मानाबाद : उस्मानाबादसह जिल्ह्यातील आठही नगर परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा कार्यभार संपला असून, येत्या १७ जुलै रोजी नव्या कारभाऱ्यांची निवड होणार आहे.

उस्मानाबाद : उस्मानाबादसह जिल्ह्यातील आठही नगर परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा कार्यभार संपला असून, येत्या १७ जुलै रोजी नव्या कारभाऱ्यांची निवड होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असल्याने अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडताना सर्वच पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा कस लागण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, इच्छुकांनीही यासाठीची मोर्चेबांधणी सुरु केली आहे.उस्मानाबाद आणि तुळजापूर नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे येथे माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील सांगतील त्याच उमेदवाराची वर्णी लागणार आहे. उस्मानाबाद पालिकेत राष्ट्रवादी २३, काँग्रेस ५ तर सेना ४ असे पक्षीय बलाबल आहे. यंदा अध्यक्षपद खुले असून, यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. यात नंदू राजेनिंबाळकर, सुनील काकडे यांच्यासह संपत डोके यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तुळजापूर नगरपालिकेतही सर्वच्या सर्व १९ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत. यावेळी नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. अ‍ॅड. मंजुषा मगर, डॉ. स्मिता लोंढे आणि जयश्री कंदले यांची नावे चर्चेत आहेत. मात्र तरीही अ‍ॅड. मगर यांचे नाव आघाडीवर आहे. दरम्यान, तुळजापूर पालिकेत कोणाला केव्हा संधी मिळणार हे यापूर्वीच ठरलेले असल्याने येथे अध्यक्ष निवडीसाठी केवळ पक्षश्रेष्ठींच्या हिरव्या कंदीलाची प्रतीक्षा आहे. परंडा पालिकेत शिवसेना ९, काँग्रेस ३, राष्ट्रवादी काँग्रेस ४ आणि भाजपा १ असे पक्षीय बलाबल आहे. पुढील नगराध्यक्ष अनुसूचित जाती या प्रवर्गातील असणार आहे. येथे राजश्री शिंदे आणि आदिका पालके यांची नावे चर्चेत असली तरी आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आदिका पालके यांना अध्यक्षपदाची संधी मिळू शकते. विशेष म्हणजे या निमित्ताने बौद्ध समाजातील व्यक्तीला पालिका इतिहासात पहिल्यांदाच हे पद मिळू शकते. पदाधिकारी निवडीमध्ये माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा निर्णय अंतिम राहणार आहे.भूम पालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. राष्ट्रवादी १२, मनसे १ आणि आघाडी ४ असे येथे पक्षीय बलाबल आहे. ओबीसी प्रवर्गातील जिजाबाई रोकडे विद्यमान अध्यक्षा आहेत. आगामी नगराध्यक्ष महिला खुल्या गटासाठी राहणार असल्याने विद्यमान उपाध्यक्ष संयोगिता गाढवे यांचीच या पदावर वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उमरगा नगर पालिकेवर शिवसेनेचा भगवा आहे. शिवसेना १२, काँग्रेस ८ असे पक्षीय बलाबल असलेल्या या पालिकेत ओबीसी राखीव प्रवर्गातील रज्जाक अत्तार अध्यक्ष आहेत. आगामी नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे नेमकी कोणाची वर्णी लागते. याबाबतची उत्सुकता आहे. केवळबाई औरादे, सुनीता मगर यांची नावे चर्चेत आहेत. येथे खा. प्रा.रवींद्र गायकवाड सांगतील तोच नगरसेवक अध्यक्षपदी विराजमान होईल अशी स्थिती आहे.मुरुम पालिकेत शिवसेना १, राष्ट्रवादी काँग्रेस १ आणि काँग्रेस १५ असे पक्षीय बलाबल आहे. सध्या काँग्रेसचे दिंडेगावे हे अध्यक्षपदी विराजमान आहेत. मुरुममध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता असल्याने बापूराव पाटील यांच्या निर्देशानुसारच अध्यक्षपदाची निवड अपेक्षित आहे.कळंबमध्ये चत्मकाराची शक्यताकळंब पालिकेत १७ पैकी १० सदस्य काँग्रेसचे असल्याने पुढील अडीच वर्षासाठीही पालिकेवर काँग्रेसचेच वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. विरोधकांनी काँग्रेसमधील नाराजांची मोट बांधली तर मात्र होणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत येथे चमत्कार घडू शकतो. पालिकेत काँग्रेस १०, राष्ट्रवादी ५ तर सेनेचे २ सदस्य आहेत. येथे काँग्रेस-सेनेत युती असून, विद्यमान अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे शिवाजी कापसे तर उपाध्यक्षपद सेनेच्या पांडुरंग कुंभार यांच्याकडे आहे. मात्र पुढील अडीच वर्ष पालिकेत काँग्रेसच्या विरोधात काम करण्याची भूमिका कुंभार यांनी मांडलेली असल्याने राष्ट्रवादी, सेना व काँग्रेसमधील नाराज नगरसेवक अशी आघाडी पालिकेमध्ये उदयास येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. आगामी अध्यक्षपद महिलेसाठी राखीव आहे. काँग्रेसकडून मीराताई चोंदे, योजना वाघमारे यांची नावे चर्चेत आहेत. आणि राष्ट्रवादी, सेना व नाराज एकत्र आले तर अनिता लोमटे, काशीबाई खंडागळे, आतिया शेख, गीता पुरी अथवा सेनेच्या कीर्ती अंबुरे यांची लॉटरी लागू शकते.