शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

मोर्चा, धरणे, निदर्शनांनी शहर दणाणले

By admin | Updated: December 6, 2014 00:17 IST

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा सरकाराच्या मंत्री, नेत्यांना ‘चांगले दिवस’आले. मात्र, मागील २५ महिन्यांपासून राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांचा नवीन वेतनवाढीचा करार प्रलंबित आहे.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा सरकाराच्या मंत्री, नेत्यांना ‘चांगले दिवस’आले. मात्र, मागील २५ महिन्यांपासून राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांचा नवीन वेतनवाढीचा करार प्रलंबित आहे. यासाठी देशभरात संप पुकारूनही मोदी सरकारने या विषयाकडे दुर्लक्ष केले. याच्या निषेधासाठी शुक्रवारी सर्व राष्ट्रीयीकृत बँका बंद ठेवण्यात आल्या. सिडकोतील स्टेट बँक आॅफ हैदराबादच्या विभागीय कार्यालयापासून रॅलीला सकाळी १0.३0 वाजता सुरुवात झाली. बँक आॅफ इंडियाच्या शाखेसमोर रॅलीची सांगता झाली. बँक आॅफ इंडियाच्या शाखेसमोर जाहीर सभा घेण्यात आली. स्टेट बँक आॅफ हैदराबाद स्टाफ असोसिएशनचे सरचिटणीस जगदीश भावठाणकर यांनी मागण्या मान्य न झाल्यास पुढील लढ्यासाठी सज्ज राहण्याचे कर्मचाऱ्यांना आवाहन केले. रवींद्र पिंगळीकर, प्रमोद भेंडे, हेमंत जामखेडकर यांची समयोचित भाषणे झाली.संचालन रवी धामणगावकर यांनी केले. निदर्शनात बी.एन. देशमुख, सतीश देशपांडे, बबन खर्डेकर, राजेंद्र देवळे, विजय कुलकर्णी, सुनीता गणोरकर, जयश्री जोशी, प्रमोदिनी गायाळ यांच्यासह शेकडो बँक कर्मचारी सहभागी झाले.अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केला आवाज बुलंदऔरंगाबाद : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज आयटक संलग्नित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला. मोर्चात जिल्हाभरातून आलेल्या शेकडो अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. पैठण गेट येथून सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. महिला आंदोलक दोन रांगा करून पुढे चालत होत्या. त्यासोबतच मोदी सरकार हाय हाय, अंगणवाडी सेविकांचे मानधन थकविणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, थकीत मानधन मिळालेच पाहिजे, अशा जोरदार घोषणा सुरू होत्या. गुलमंडी, सिटी चौक, शहागंजमार्गे हा मोर्चा दुपारी १ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला.या ठिकाणी मोर्चेकरी महिलांनी रस्त्यावरच ठाण मांडले. त्यामुळे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. युनियनचे अध्यक्ष राम बाहेती, तारा बनसोडे, अनिल जावळे आदींची भाषणे झाली. त्यानंतर मोर्चेकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासूनचे थकलेले मानधन अदा करावे, मानधन अदा करण्यासाठी शासनाने मायनस सिस्टीम पूर्ववत सुरू करावी, अंगणवाडी सेविकांना मानधनाएवढा दिवाळी बोनस द्यावा, रिक्त जागा भराव्यात, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.मोर्चात राम बाहेती, तारा बनसोडे, अनिल जावळे, विलास शेंगुळे, रफत सिद्दीकी, चंचल खंडागळे, प्रमिला सोनवणे, मंगला परदेशी, सुनीता भोकरे, आशा सोनवणे, मीरा आडसरे, प्रमिला शिंदे, शीला साठे, सविता अंभोरे आदी सहभागीझाले. कामगारविरोधी कायदे रद्द करा : क्रांतीचौकात धरणे औरंगाबाद : कामगारविरोधी कायदे रद्द करा, कंत्राटी पद्धत रद्द करा, मोदी सरकारचे कामगारविरोधी धोरण हाणून पाडा, ईएसआयचे दवाखाने सर्व सोयींनी युक्त करा या मागण्यांसाठी आज सकाळी ११ ते ३ या वेळेत क्रांतीचौकात महाधरणे आंदोलन करण्यात आले. ५ डिसेंबर देशव्यापी विरोध दिवसाचा एक भाग म्हणून हे आंदोलन कामगार- कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आले. त्यात सुमारे एक हजार कामगार- कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. सीटू, आयटक, बीएमएस, इंटक, विमा, बँक, दूरसंचार, वीज, राज्य व केंद्र सरकारी कर्मचारी संघटना, सिमेन्स, घर कामगार, आशा कामगार, मिड डे मिल वर्कर, अहमदनगर फोर्जिंग कामगार कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. नंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व आपल्या अकरा मागण्यांचे निवेदन सादर केले. महाधरणे आंदोलनाचे नेतृत्व कॉ. उद्धव भवलकर, कॉ. डॉ. भालचंद्र कानगो, कॉ. बुद्धिनाथ बराळ, एम.ए. गफार, विठ्ठल कदम, बेंबळीकर, लक्ष्मण साक्रुडकर, दामोदर मानकापे, दीपक अहिरे, छगन साबळे, के.एन. झा, रंजन दाणी, उमेश कुलकर्णी, जगदीश भावठाणकर, ए.डी. जरारे आदींनी केले. जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र व राजस्थान सरकारने श्रमिक कायद्यात बदल केले आहेत. हे करताना ट्रेड युनियन्सला अंधारात ठवले आहे. त्यांच्याशी कसलीही चर्चा केलेली नाही. कॉर्पोरेट हाऊसेसच्या मालकांना खुश करण्याचा हा प्रयत्न होय. मनरेगामार्फत वर्षाला २०० दिवस काम उपलब्ध करून द्या आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.