शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणीत मित्राचा मृत्यू ; सदोष मनुष्य वधाच्या आरोपाखाली दोघांना सश्रम कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 18:43 IST

लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने झाला मृत्यू

औरंगाबाद : महेबूब गौरी (१७) या मुलाचा आरोपींनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. महेबूबला मारहाण करणारे प्रशांत केशवराव म्हस्के (३६, रा. न्यू नंदनवन कॉलनी) आणि प्रमोद जयवंतराव निर्मल (३२, रा. शिवूर, ता. वैजापूर) या दोघांना सत्र न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी ‘सदोष मनुष्यवधाच्या’ आरोपाखाली भादंवि कलम ३०४ (रोमन-दोन) अन्वये प्रत्येकी साडेचार वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला. 

यासंदर्भात महेबूबचे वडील अ‍ॅड. गुजरशाह अली गौरी (४७, रा. देवगिरी कॉलनी, क्रांतीचौक) यांनी तक्रार दिली होती की, ३१ डिसेंबर २०१५ रोजी महेबूब गौरी हा प्रशांत म्हस्के, प्रमोद निर्मल व तीन मैत्रिणींसह नववर्षाच्या पार्टीसाठी बीड बायपास येथील एका हॉटेलात गेले होते. तेथे महेबूब व दोघे आरोपी दारू प्याले. महेबूबला दारू जास्त झाल्याने आरोपींनी त्याला घराजवळ सोडले. तसेच महेबूबच्या मैत्रिणीलासुद्धा आरोपींनी घरी सोडले.

त्यानंतर आरोपी व त्यांच्या दोन मैत्रिणी बसस्थानकासमोरील एका लॉजमध्ये गेले. महेबूबला त्याची मैत्रीणदेखील आरोपींसोबत असल्याचा संशय आला. तो त्यांच्यापाठोपाठ लॉजवर गेला. तेथे त्याने आरोपींकडे त्याच्या मैत्रिणीबाबत विचारपूस केली असता आरोपींनी त्याला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. बेशुद्ध अवस्थेत आरोपींनी त्याला लॉजवरील जनरल रूममध्ये ठेवले. महेबूब हालचाल करीत नसल्याने लॉजच्या व्यवस्थापकाने दोघा आरोपींना सांगितले व त्याला घाटी दवाखान्यात दाखल करण्यास सांगितले. 

त्यानुसार आरोपींनी महेबूबला घाटी दवाखान्यात नेले. समर्थनगर येथील मोकळ्या जागेत लघुशंकेसाठी गेलो असता तेथे अज्ञात मुलगा बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याला दवाखान्यात आणल्याचे आरोपींनी सांगितले. त्यावरून एमएलसी दाखल करण्यात आली. पोलिसांनी तपास केला असता वरील सर्व घटना उघडकीस आली. यासंदर्भात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता अरविंद बागूल यांनी २२ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यात मयताची मैत्रीण, लॉजचे कर्मचारी व सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरले. सुनावणीअंती न्यायालयाने दोन्ही आरोपींना वरीलप्रमाणे शिक्षा व दंड, प्रशांत म्हस्के याला कलम २०१ अन्वये एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड आणि कलम १८२ अन्वये ६ महिने सक्तमजुरी व ५०० रुपये दंड ठोठावला.