शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

फुकटच्या प्रसिध्दीची हौस भारी !

By admin | Updated: June 16, 2014 01:16 IST

प्रतिनिधी ल्ल उस्मानाबाद सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणे, हा कायद्यानुसार गुन्हा आहे.

प्रतिनिधी ल्ल उस्मानाबादसार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणे, हा कायद्यानुसार गुन्हा आहे. परंतु, उस्मानाबाद शहरातील विविध शासकीय कार्यालयाच्या संरक्षक भिंती, बसस्थानक आदी ठिकाणांकडे पाहता कुणालाही या कायद्याचा धाक राहिल्याचे दिसत नाही. त्यामुळेच फुकटच्या प्रसिध्दीसाठी विविध संस्था, संघटनांनी भिंती रंगवून पोस्टर, भित्तीपत्रके चिटकवून सार्वजनिक ठिकाणांची वाट लावल्याचे दिसत आहे.चौका-चौकात जाहिरातबाजी करण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने ठराविक शुल्क आकारून होर्र्टींग्ज उभारण्यासाठी रीतसर परवानगी देण्यात येते. परंतु, फुकटच्या प्रसिध्दीसाठी अनेक संस्था, संघटना छोट्या-छोट्या कार्यक्रमांचे, मेळावे आदींची जाहिरातबाजी ही अशा सार्वजनिक ठिकाणी असलेल्या संरक्षक भिंती, झाडे, रस्ता दुभाजक आदी ठिकाणी पोस्टर चिटकावून केली जात असल्याचे सर्रास दिसून येते. सार्वजनिक ठिकाणी कोणाचीही परवानगी न घेता पोस्टर किंवा पॉम्लेट चिटकावून किंवा तेथील भिंती रंगवून करण्यात येणाऱ्या या जाहिरातबाजीकडे प्रशासनही कानाडोळा करीत असल्याने यावर कुणाचाच अंकुश नसल्याचे दिसते. शहराचे विद्रुपीकरण थांबविण्यासाठी प्रशासनाने गांभिर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. झाडे होताहेत कमकुवतएकीकडे ‘झाडे लावा झाडे जगवा’ या ब्रिदातून शासन पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात पैसाही खर्च होत आहे. असे असतानाच दुसरीकडे मात्र काही जण केवळ जाहिरातबाजीसाठी झाडांना इजा पोहोचविण्यास मागेपुढे पाहत नसल्याचे दिसत आहे. शहरातील अनेक झाडांवर बिनदिक्कतपणे फलक ठोकल्याचेही दिसते. विशेषत: मुख्य रस्त्यांच्या झाडांचा यासाठी वापर होत असल्याचे दिसते. यामुळे झाडे कमकुवत होत असून, वन कायदा एवढा सक्षम असतानाही त्याचा कुणाला धाक नसल्याचेच यावरून दिसून येते. कायद्याची भीती कुणाला ?सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणी म्हणजेच रस्त्याच्या कडेला व दुभाजकांवर तसेच शासकीय तथा निमशासकीय कार्यालये या ठिकाणी पोस्टर लावणे, भिंती रंगविणे हा महाराष्ट्र विद्रुपीकरण कायदा कलम ३ अन्वये गुन्हा आहे. या गुन्ह्यात दोन वर्षांची कैद आणि एक हजार रूपयांपर्यंतच्या दंडाचीही तरतूद आहे. शहरातील सार्वजनिक मालमत्तांवर नजर टाकल्यास या कायद्याची कुणालाही भीती राहिली नसल्याचे दिसून येते.