शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

५ लाखांपर्यंत मोफत उपचार कागदावरच; उपचारासाठी कर्जाचीच वेळ, अंमलबजावणी कधी?

By संतोष हिरेमठ | Updated: August 29, 2023 13:17 IST

अंमलबजावणीची प्रतीक्षाच, रुग्णालयांमध्ये वादाच्या घटना

छत्रपती संभाजीनगर : महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत आता ५ लाखांपर्यंत मोफत उपचार करण्याची घोषणा करण्यात आली. राज्य मंत्रिमंडळात तसा निर्णय घेण्यात आला. शासन निर्णयही निघाला. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणीच होत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे उपचारासाठी पैशांची जुळवाजुळव करण्याची, कर्ज काढण्याचीच वेळ अनेकांवर ओढवत आहे.

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत आता पाच लाखांपर्यंत उपचार करता येणार असल्याचे मार्चच्या प्रारंभी जाहीर करण्यात आले. या योजनेत विमा संरक्षण १.५० लाखाहून पाच लाख रुपये करण्याचा निर्णय राज्याच्या अर्थसंकल्पात घेण्यात आला. जुलैअखेर शासन निर्णयही जाहीर करण्यात आला. प्रत्यक्षात अद्यापही दीड लाखाचेच विमा संरक्षण मिळो. ‘लोकमत’ने घाटी रुग्णालयासह खाजगी रुग्णालयातील या योजनेच्या कक्षाला भेट देऊन माहिती घेतली. तेव्हा अद्याप अंमलबजावणी सुरू झाली नसल्याचे सांगण्यात आले. जनआरोग्य योजनेच्या अधिकाऱ्यांनी याविषयी बोलण्यास नकार दिला.

जिल्ह्यात किती रुग्णालये संलग्नित?औरंगाबाद जिल्ह्यात एकूण ३८ रुग्णालये एकत्रित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व फुले जन आरोग्य योजनेशी संलग्नित आहेत. या सर्व रुग्णालयांमध्ये या योजनेचा गोरगरीब रुग्णांना मोफत उपचाराचा लाभ घेता येतो.

नातेवाइकांना वाटते रुग्णालयेच करतात अडवणूकम. फुले जनआरोग्य योजनेत ५ लाखांपर्यंत वाढ करण्यात आल्याची सूचना रुग्णालयांना करण्यात आलेली आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. कोणत्या पॅकेजमध्ये किती वाढ झाली, हे स्पष्ट नाही. रुग्णांच्या नातेवाइकांना वाटते की, रुग्णालये अडवणूक करतात. त्यातून वादही होतात. मात्र, रुग्णालये सहकार्य करतात. सर्व प्रक्रिया आरोग्य मित्र करीत असतात.- डाॅ. हिमांशू गुप्ता, अध्यक्ष, मराठवाडा हाॅस्पिटल असोसिएशन

५ महिन्यांत किती जणांवर उपचार?जिल्ह्यात एप्रिल ते ऑगस्ट (आतापर्यंत) १४ हजार ४०७ लाभार्थ्यांनी मोफत उपचारांचा लाभ घेतला. यासाठी ७४ कोटी ८० लाख ४२ हजार ६०५ रुपयांचे उपचार मंजूर करण्यात आले.

- योजनेत समाविष्ट उपचार संख्या- १,३५६- केवळ शासकीय रुग्णालयांसाठी राखीव उपचार-११९- राज्यातील अंगीकृत रुग्णालयांची संख्या-१,३५०

टॅग्स :doctorडॉक्टरAurangabadऔरंगाबाद