शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

शेतकऱ्यांना मोफत बियाणे द्यावेत

By admin | Updated: May 8, 2016 23:47 IST

औसा : दुष्काळ निवारणासाठी शासनाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत़ त्यामुळे शेतकरी होरपळत आहे़ गेल्या मोसमात पेरण्या झाल्या नाहीत़

औसा : दुष्काळ निवारणासाठी शासनाचे प्रयत्न अपुरे पडत आहेत़ त्यामुळे शेतकरी होरपळत आहे़ गेल्या मोसमात पेरण्या झाल्या नाहीत़ त्यामुळे आता शेतकऱ्यांकडे पेरण्या करण्यासाठी पैसा नाही, अशा परिस्थितीत शासनाने मोफत बी-बियाणे व खताचा पुरवठा करणे आवश्यक आहे, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी येथे रविवारी व्यक्त केले़औसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने नगर परिषदेच्या मैदानावर रविवारी दुष्काळ परिषद झाली़ यावेळी ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते़ मंचावर माजीमंत्री आ़मधुकरराव चव्हाण, आ़बसवराज पाटील, आ़अमर राजुरकर, माजी आ़शिवाजीराव पाटील कव्हेकर, जि़प़अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, प्रदीप राठी, जिल्हा काँग्रसचे अध्यक्ष व्यंकट बेद्रे, अशोकराव पाटील निलंगेकर, अप्पासाहेब पाटील, रामकिसन ओझा, अ‍ॅड़अस्मिता काटे, ज्योती पवार, सुलोचना बिदादा, अ‍ॅड़मुजीबोद्दीन पटेल, स्वयंप्रभा पाटील, निता सुर्यवंशी, अमर खानापूरे, पांडुरंग चेवले, कोमल सुर्यवंशी, नारायण लोखंडे, शरण पाटील, बिरबल देवकते, बसवराज धाराशिवे, प्रा़सचिन आलुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी अशोक चव्हाण म्हणाले, खरीप हंगामासाठी मोफत खत, बी-बियाणे सरकारने दिली पाहीजेत़ त्याच बरोबरच विद्यार्थ्यांची शुल्क, महामंडळाचे कर्ज माफ करून दावणीला चारा उपलब्ध करून दिला पाहीजे़ शेती मालाला हमीभाव देऊन कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार व बागायतदारांना ५० हजार रुपये अनुदान देण्यात यावे़ शेतकरी, शेतमजुरांना कायमस्वरुपी पेन्शन योजना लागू करावी़ पशुधनाचा विमा उतरविण्यात यावा असेही ते म्हणाले़ मराठवाड्यात मोठा दुष्काळ पडला आहे़ परंतू, देशाचे पंतप्रधान दुष्काळ पाहण्यासाठी आले नाहीत, पण त्यांना मराठवाड्यातील दुष्काळ दाखविण्याची गरज आहे़ आम्ही सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची भाषा करणारे आता सत्तेत आहेत़ त्यांना सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाहीत़ यावेळी आत्महत्या केलेल्या १८ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० हजारांची मदत दिली. प्रास्ताविक आ़बसवराज पाटील यांनी केले़ यावेळी माजीमंत्री आ़मधुकर चव्हाण, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़व्यंकट बेद्रे, माजी आ़शिवाजीराव पाटील कव्हेकर, अशोकराव पाटील यांची भाषणे झाली़ (वार्ताहर)विलासराव देशमुख यांनी काहीच केले नाही, असे विरोधकांकडून शब्द वापरले जात आहेत़ मात्र विलासरावांनी मराठवाडा आणि महाराष्ट्राचा चौफेर विकास केला आहे़, हे विरोधकांना दिसत नाही़ स्वत:चे अपयश झाकण्यासाठी सत्ताधारी टीका करीत आहेत़ काँग्रेसची सत्ता असताना जिल्ह्या-जिल्ह्यात विकासकामे झाली़ परंतु, या दुष्काळावर राज्य शासन गंभीर नाही़ त्यांना सरकार चालविता येत नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काही पडेल, याची शक्यता नसल्याचे खा़चव्हाण यावेळी म्हणाले़