शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांच्या अत्यावश्यक सुरक्षा कीट वाटपात घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 15:45 IST

१२०० ते १६०० रुपये घेऊन कीट वाटप होत असल्याचा आरोप उपस्थित मजुरांनी केली.

ठळक मुद्देदलालांमुळे मोफत कीटला द्यावी लागतेय किंमत  ऑनलाईन अर्ज भरताना काही दलाल स्वत:चा संपर्क क्रमांक टाकतात.

औरंगाबाद : राज्य शासनाच्या कामगार विभागाकडून बांधकाम व्यावसायिकांकडे काम करणाऱ्या कामगारांसाठी मोफत देण्यात येणाऱ्या अत्यावश्यक आणि सुरक्षा कीट वाटपावरून शुक्रवारी गदारोळ झाला. या कीट वाटपात मोठा घोळ असून, दलालांचे मोठे रॅकेट यामध्ये सक्रिय असल्याचा आरोप कामगारांनी केला. 

जालना रोडवरील कैलाश आर्केडच्या तळमजल्यावरील गोदामात कामगारांना वाटप करण्यााठी कीट आल्या आहेत. इंडो प्रा.लि. (मुंबई) या एजन्सीच्या माध्यमातून सदरील कीट वाटप सुरू होते. सुरक्षा आणि अत्यावश्यक अशा दोन्ही कीट सोबत देण्यात याव्यात, अशी मागणी करीत कामगारांनी एजन्सीच्या प्रतिनिधींना गराडा घालून गदारोळ सुरू केला. हा सगळा प्रकार घडत असताना कामगार उपायुक्तालयाचा एकही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही. दरम्यान, भाजप कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सदरील प्रकार समजून घेतल्यानंतर याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक केंद्रे यांच्याकडे तक्रार केली. दलालांचे रॅकेट कसे चालते, महिलांकडून १२०० ते १६०० रुपये घेऊन कीट वाटप होत असल्याचा आरोप उपस्थित मजुरांनी केली. यावेळी कामगार आघाडीचे बबनराव पेरे, विशाल गंगावणे आदींची उपस्थिती होती.

अत्यावश्यक कीटमध्ये कायअत्यावश्यक कीटमध्ये बॅटरी, चटई, मच्छरदाणी, पेटी, वॉटरबॅग, खांद्यावरील बॅग आदी वस्तूंचा समावेश आहे, तर सुरक्षा कीटमध्ये हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, बूट, मोजे आदी वस्तूंचा समावेश आहे. प्रत्येक कीटची सरासरी किंमत ७ हजार रुपये आहे. दोन किटची किंमत १४ हजार रुपये असून, बांधकाम मजूरांना मोफत देण्यात येतात. आजवर जिल्ह्यात १८ हजार कीट वाटप करण्यात आल्या आहेत. २ हजार सुरक्षा कीट वाटप होणे बाकी आहे. 

अशी चालते दलालीकीट वाटपामध्ये दलाली होत आहे. आॅनलाईन अर्ज भरताना काही दलाल स्वत:चा संपर्क क्रमांक टाकतात. कीट आल्याचा मेसेज त्या दलालांच्या मोबाईलवर गेला की, ते लाभार्थ्यांला फोन करून कीट आल्याचे सांगत लाभार्थ्यांकडून ठरलेली रक्कम घेतात. कीट वाटपाचे ठिकाण पैसे मिळाल्यानंतरच ते सांगतात. असा प्रकार काही अशिक्षित मजुरांच्या बाबतीत घडल्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला. कामगार उपायुक्त पोळ हे पुण्यातून सगळा कारभार पाहतात, तसेच येथील जबाबदार अधिकारीदेखील याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfraudधोकेबाजी