शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

टीव्हीवर सिनेमा पाहून चौथीतील विद्यार्थ्याने घेतला गळफास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 13:25 IST

विकास मछिद्र पवार असे मृत मुलाचे नाव असून ज्यावेळी विद्यार्थाने गळफास घेतला त्यावेळी घरातील टीव्ही वर सिनेमा सुरू होता.

औरंगाबाद - चौथीत शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्याघरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  बुधवारी सायंकाळी वाळूज परिसरातील सिडको महानगर १ येथे ही घटना घडली . विकास मछिद्र पवार असे मृत मुलाचे नाव असून ज्यावेळी विद्यार्थाने गळफास घेतला त्यावेळी घरातील टीव्ही वर सिनेमा सुरू होता. सिनेमातील दृष्य पाहून त्याचे अनुकरण करण्याच्या नादात विकासने गळफास घेतला आणि यात त्याचा  मृत्यू झाला असावा अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,सिडको महानगर १, वाळूज परिसर येथे राहणाऱ्या मच्छिंद्र पवार यांचा विकास हा एकुलता एक मुलगा होता, त्याला दोन बहिणी आहेत. पवार हे माजी सैनिक आहेत. मच्छिंद्र पवार आणि त्यांची पत्नी येथील औद्योगिक वसाहतीत खाजगी नोकरी करतात. बुधवारी सकाळी रोजच्या प्रमाणे ते कामावर गेले होते. तर विकासच्या दोन्ही बहिणी शाळेत गेल्या होत्या. विकास घरी एकटाच होता.संध्याकाळी सव्वाचार वाजेच्या सुमारास दोन्ही बहिणी शाळेतून घरी आल्यावर विकासने  ओढणीच्या साह्याने पंख्याला गळफास घेतला असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी या घटनेची माहिती  वडिलांना फोनवरून दिली. वडिलांनी तातडीने घरी येवून शेजारच्या मदतीने विकासला  दवाखान्यात दाखल केले . तेथील डॉक्टरांनी विकासला  तपासून  मयत घोषित केले. 

११ वर्षीय विकासने आत्महत्येचा टोकाचा निर्णय का घेतला. याचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. तसेच ज्यावेळी विद्यार्थाने गळफास घेतला त्यावेळी घरातील टीव्ही वर सिनेमा सुरू होता. सिनेमातील दृष्य पाहून त्याचे अनुकरण करण्याच्या नादात विकासने गळफास घेतला आणि यात त्याचा  मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र हा अपघात आहे की आत्महत्या या दृष्टीकोनातून पोलिस याचा तपास करत आहेत. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस हवालदार गणेश आंतरप हे करीत आहेत.