शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
2
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
3
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
4
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
5
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
6
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
7
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
8
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
9
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
10
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
11
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
12
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
13
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
14
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
15
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
16
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
17
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
18
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
19
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
20
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?

वीस मिनिटांत चौदा लाखांची घरफोडी

By admin | Updated: July 25, 2016 01:09 IST

औरंगाबाद : शहरात चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांची धूम जोरात सुरू आहे. सिडको एन-६ भागातील टेलिकॉम सोसायटीतील एक बंगला फोडून चोरट्यांनी

औरंगाबाद : शहरात चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांची धूम जोरात सुरू आहे. सिडको एन-६ भागातील टेलिकॉम सोसायटीतील एक बंगला फोडून चोरट्यांनी साडेअकरा लाखांच्या रोख रकमेसह सात तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि २५ हजारांची नाणी चोरून नेली. रविवारी पहाटे ४.१२ ते ४.३२ दरम्यान अवघ्या वीस मिनिटांत बंगला फोडून चोरटे पसार झाले. सिडको एन-६ मधील टेलिकॉम सोसायटीमध्ये साईकृपा या बंगल्यात गणेश नागनाथ कोंडावार (५५) हे मुलगा अनिकेत (३०), सून प्रीती (२५) आणि नात आरोही (२) यांच्यासह राहतात. कोंडावार यांचे प्रोझोन मॉल रोडवरील भारत बाजार येथे कार अ‍ॅक्सेसरिज विक्रीचे दुकान असून, ते बांधकाम ठेकेदारही आहेत. चार दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते गारखेड्यातील एका खाजगी रुग्णालयात भरती होते. त्यांच्या घरी आलेल्या मावस बहिणीला नांदेड येथे देवगिरी एक्स्प्रेसने जायचे होते. त्यावेळी एका बेडरूममध्ये प्रीती या चिमुकल्या आरोहीसह गाढ झोपेत होत्या. त्यामुळे त्यांना न जागवता अनिकेत मावस बहिणीसह रेल्वेस्टेशन येथे सोडण्यासाठी पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास घराला बाहेरून कुलूप लावून बाहेर पडले. त्यानंतर ४ वाजून १२ मिनिटांनी दोन चोरट्यांनी बंगल्याच्या कम्पाऊं ड वॉलवरून उड्या मारल्या. चोरट्यांनी दरवाजाचा कोंडा तोडून घरात प्रवेश केला. तळमजल्यावरील चार रूमच्या या घरातील ज्या बेडरूममध्ये माय-लेकी झोपलेल्या होत्या, त्या रूमला चोरट्यांनी बाहेरून कडी लावली. त्यानंतर शेजारील दुसऱ्या बेडरूममध्ये प्रवेश करून चोरट्यांनी तेथील एका ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या (पान ५ वर)माहीतगार व्यक्तींचाच या घरफोडीमागे हात असावा, असा पोलिसांना संशय आहे. कारण कोंडावार हे रुग्णालयात भरती आहेत आणि अनिकेत हा मावस बहिणीसह रेल्वेस्टेशन येथे गेल्यानंतर चोरटे बंगल्यात प्रवेश करतात. ४एवढेच नव्हेतर ज्या रूममध्ये रोख रक्कम आहे, त्या रूममधील ड्रॉवरमधून चाव्या शोधून चोरटे कपाट उघडतात आणि १४ लाखांच्या ऐवजांसह पसार होतात. अवघ्या वीस मिनिटांत ही चोरी होते... शिवाय चोरट्यांनी घरातील अन्य रूममध्ये प्रवेश केला नाही. एरव्ही चोरटे मिळेल ते झाडून सगळा ऐवज लुटण्याचा प्रयत्न करतात.चोरट्यांनी कोंडावार यांच्या घरातील चिल्लर पैशांच्या दोन वजनदार पिशव्या घेतल्यानंतर पुन्हा कम्पाऊंड वॉलवरून उड्या मारल्या. ४विशेष म्हणजे चोरटे हे मोटारसायकलने आले होते. नाण्याच्या वजनदार पिशव्या दुचाकीवरून दोघांच्यामध्ये ठेवून ते निघून गेल्याचे घटनास्थळापासून काही अंतरावरील विविध घरांवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.