शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
2
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
3
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
4
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
5
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
6
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
7
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
8
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
9
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
10
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
11
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
12
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
13
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
14
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
15
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
16
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
17
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
18
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
19
अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?
20
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस

आरटीओ कार्यालयातील ‘लक्ष्मी दर्शन’च्या रकमेत मिळतो चार जणांना वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 13:21 IST

आरटीओतील खाबूगिरीने आर्थिक पिळवणूक होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. 

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयातील ‘लक्ष्मी दर्शन’च्या रकमेत एजंटसह यंत्रणेतील चौघांचा वाटा आहे. लाखो रुपयांची ही रक्कम महिन्याकाठी प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी यंत्रणेचे ‘सारथी’ पार पाडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

नव्या वाहनांच्या पासिंगसाठी आरटीओ कार्यालयात सुरूअसलेला खाबूगिरीचा प्रकार ‘लोकमत’ने ‘पासिंगसाठी ३६० रुपयांचे लक्ष्मी दर्शन’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून समोर आणला. वृत्त प्रकाशित होताच आरटीओतील खाबूगिरीने आर्थिक पिळवणूक होत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. 

‘लक्ष्मी दर्शन’साठी सुरू असलेल्या साखळीची माहितीही काहींनी ‘लोकमत’ला दिली. यासाठी वाहनमालक आणि शोरुमचालकांना भुर्दंड बसत असल्याने हा प्रकार कायमचा रोखण्यासाठी उपाययोजना होण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.  आॅनलाईन प्रणालीमुळे फायलींची प्रक्रिया कायमची संपुष्टात येणे शक्य आहे, तशी सुविधाही या प्रणालीत आहे; परंतु कार्यालयातील कामकाज आॅनलाईन होऊनही फायलींचा खेळ केवळ ‘लक्ष्मी दर्शन’साठीच सुरू ठेवण्यात आला. आजघडीला दुचाकी वाहनांच्या पासिंगपोटी प्रत्येक फाईलमागे ३६० रुपये देण्याची नामुष्की शहरातील अनेक शोरुमचालकांवर येत आहे. 

यामध्ये काही शोरुमचालकांना तर वाहनांच्या पासिंगसाठी ७८० रुपये देण्याची वेळ येत असल्याचे नव्या सूत्रांकडून माहिती मिळाली. स्वत:च्या खिशातून देणे अशक्य असल्याने ही रक्कम थेट ग्राहकांकडून काढण्यासाठी अनेकांना वेगवेगळे मार्ग निवडावे लागतात. यामध्ये ‘फाईल हॅण्डलिंग’च्या नावाखाली रक्कम काढली जात असल्याचे सांगण्यात आले. आरटीओ कार्यालयातून वाहन पासिंग करून घेण्यासाठी ही रक्कम द्यावीच लागते, असे ग्राहकांना सांगितले जाते. त्यामुळे ग्राहकही काहीही न बोलता ही रक्कम देऊन मोकळे होतात.

अशी होते वाटणी‘लक्ष्मी दर्शन’च्या ३६० रुपयांमध्ये प्रत्येकी १०० रुपयांचे दोन वाटे, ५० रुपयांचा एक असे तीन वाटे यंत्रणेचे आणि उर्वरित वाटा एजंटचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मोठ्या रकमेचा वाटाही अशाच पद्धतीने होतो. या सगळ्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची यंत्रणेकडून चांगलीच ‘दमछाक’ केली जाते. त्यामुळे यंत्रणेच्या साखळीत सहभागी होण्याशिवाय पर्याय उरत नाही.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबादCorruptionभ्रष्टाचार