शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील चार पंचायत समित्या होणार चकाचक

By admin | Updated: August 7, 2014 02:05 IST

जालना: जिल्ह्यातील परतूर, मंठा, अंबड व जाफराबाद या चार पंचायत समितीच्या इमारतीअंतर्गत फर्निचरसह सुशोभिकरणाच्या कामांना आता मुहूर्त सापडला आहे.

जिल्ह्यातील चार पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारती अंतर्गत फर्निचर व्यवस्था व सुशोभिकरणाच्या कामांना मुहूर्त लागावा म्हणून लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा मोठा पाठपुरावा केला. अखेर उशिरा का होईना या कामांना राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखविला. त्या पाठोपाठ या कामांसाठी ग्रामविकास मंत्रालयाने प्रशासकीय मान्यता बहाल केली. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षक अभियंत्यांनी कामाच्या अंदाजपत्रकासह व तांत्रिक मान्यता बहाल केली. मंठा येथील समितीच्या इमारतीत फर्निचर सुशोभिकरणाकरिता ४९ लाख ७६ हजार २८४ रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अंबड येथील कामांकरिता ४९ लाख ९८ हजार ५०० रुपये, जाफराबाद येथील कामांकरिता ४९ लाख ९७ हजार ५५८ व परतूर येथील कामांकरिता ४९ लाख ९७ हजार ७८ रुपये मंजूर करण्यात आले आहेत.या चारही पंचायत समितीच्या कामांच्या निविदा प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहेत. या कामांसाठी आॅनलाईनद्वारे, एकदा नव्हे तीनदा बोलविण्यात आल्या. त्यास अल्प प्रतिसाद मिळाला. अखेर तिसऱ्यांदा बोलविलेल्या निविदांतून या संदर्भातला अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांसह मुख्य लेखा वित्त अधिकारी यांनी निविदांचे दरपत्रक निश्चित केले असून, त्यामुळे या कामांना लवकरच मुहूर्त लागेल अशी चिन्हे आहेत. दरम्यान या चारही पंचायत समितीत फर्निचर व साहित्याअभावी अनेक अडचणी उद्भवत होत्या. (प्रतिनिधी)भोकरदन तालुक्यातील मौजे पिंपळगाव रेणुकाई व मौजे लेहा येथील ग्रामपंचायत कार्यालय व चावडी इमारत जीर्ण झाली असून, ती मोडकळीस आल्याने ती इमारत पाडली जाणार आहे. संंबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी या संदर्भात २५ जुलै रोजी जिल्हा परिषेस प्रस्ताव सादर केला होता. लगेच बांधकामच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. अधीक्षक अभियंत्यांची आता ना हरकत प्रमाणपत्र घेऊन ती इमारत पाडली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली.