शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
5
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
6
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
7
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
8
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
9
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
10
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
11
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
12
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
13
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
14
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
15
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
16
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
17
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
18
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
19
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
20
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो

अन्नपदार्थांचे घेतले नमुने चार ‘मेडिकल’चे परवाने निलंबित

By admin | Updated: November 17, 2015 00:29 IST

उस्मानाबाद : फार्मासिस्टच्या अनुपस्थितीत औषधांची विक्री करण्यासह इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अणदूर (ता़तुळजापूर) येथील एका

उस्मानाबाद : फार्मासिस्टच्या अनुपस्थितीत औषधांची विक्री करण्यासह इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अणदूर (ता़तुळजापूर) येथील एका औषध दुकानाचा परवाना औषध प्रशासनाकडून रद्द करण्यात आला आहे़ तर इतर चौघांचे परवाने काही दिवसांकरिता निलंबीत करण्यात आले आहेत़जीवनावश्यक सुविधांपैकी एक असलेल्या औषधांची डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शननुसार आणि फार्मासिस्टच्या उपस्थितीत विक्री व्हावी, असे आदेश देण्यात आले आहेत़ त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाकडून जिल्ह्यातील औषधी दुकानांना याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत़ औषधी दुकानात फार्मास्टि नसताना औषधांची विक्री केल्या प्रकरणी चालू वर्षात तब्बल ३१ औषधी दुकानांचे परवाने काही कालावधीकरिता निलंबीत करण्यात आले होते़ तर ९ जणांचा परवानाही रद्द करण्यात आला आहे़ याच अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाकडून आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील विविध औषध दुकानांची तपासणी मोहीम राबविण्यात आली होती़ या तपासणी मोहिमेत चार औषध दुकानांमध्ये फार्मासिस्टच्या अनुपस्थितीत औषधांची विक्री होत असल्याचे दिसून आले़ यानुसार औषध प्रशासनाने काही कालावधीकरिता या औषध दुकानांचे परवाने निलंबीत केले आहेत़ यात लोहारा तालुक्यातील जेवळी येथील साई मेडिकल अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्सचा परवाना ३० दिवसांसाठी, कळंब येथील साईप्रसाद मेडिकलचा परवाना पाच दिवसांसाठी, तुळजापूर येथील लोखंडे मेडिकलचा परवाना तीन दिवसांसाठी व आशीर्वाद मेडीकलचाही परवाना काही दिवसांसाठी निलंबीत करण्यात आला आहे़ तर तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील शिवशंभो मेडिकल दुकानाचा परवानाच रद्द करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी) दिवाळी सणाच्या कालावधीत अन्न व औषध प्रशासनाकडून खवा, दूध, तेल यासह इतर अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत़ या यातील कोणत्याही नमुन्यात दोष आढळून आला तर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले़