शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
12
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
14
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
15
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
16
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
17
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
18
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
19
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
20
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा

साडेसातशे नळ कनेक्शन बोगस

By admin | Updated: November 17, 2015 00:29 IST

नळदुर्ग : शहरामध्ये तब्बल ७५० नळकनेक्शन बोगस तर ७० टक्के शासकीय जमिनीवर अतिक्रमण झाल्याची माहिती नगर परिषदेने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

नळदुर्ग : शहरामध्ये तब्बल ७५० नळकनेक्शन बोगस तर ७० टक्के शासकीय जमिनीवर अतिक्रमण झाल्याची माहिती नगर परिषदेने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. त्यामुळे एकीकडे डिसेंबर अखेर नळदुर्ग अतिक्रमण मुक्त करण्याचा संकल्प न.प. प्रशासनाने केलेला असतानाच दुसरीकडे ही आकडेवारी समोर आल्याने पालिकेचा हा संकल्प कितपत यशस्वी होणार, याबाबत शंका व्यक्त होत आहे.राष्ट्रीय महामार्गावरील दळणवळणाचे केंद्र असलेले ऐतिहासिक शहर म्हणून नळदुर्गची ओळख आहे. वीस हजार लोकसंख्येच्या या शहराच्या नगर परिषदेत १७ नगरसेवक आहेत. तर साडेसहा चौरस किलोमिटर क्षेत्रफळावर हे शहर वसलेले आहे. ३४०० घरे असलेल्या या गावात २००१ नळ कनेक्शन अधिकृत तर ७५० अनधिकृत असल्याची माहिती न.प. सर्वेक्षणातून पुढे आली आहे. याशिवाय बसस्थानक परिसर, अक्कलकोट रोड, बसस्थानक ते किल्ला रोड, नानीमा दर्गा, किल्ला गेट या महत्वाच्या ठिकाणी १६५ नागरिकांची अतिक्रमणे असल्याची माहितीही सर्वेक्षणातून उघड झाली आहे.दरम्यान, अतिक्रमण हटविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनीही सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिल्याने न.प.ने अतिक्रमण कंबर कसली आहे. अनधिकृत नळ कनेक्शन व अतिक्रमणाबाबत मुख्याधिकारी निंगण्णा पाटील म्हणाले की, सध्या पाणी टंचाई आहे. अशा परिस्थितीमध्ये शहरात ७५० नळ अनधिकृत आहेत. सदर नळ नियमित करुन घेवून थकबाकी वसूल करण्यात येणार आहे. शिवाय शहराला अतिक्रमणाच्या जखडातून मुक्त करण्यासाठी डिसेंबर अखेरपर्यंत मोहीम राबविली जाणार आहे. त्यापूर्वी नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे व नळ कनेक्शन नियमित करुन घ्यावे, अन्यथा पाणी चोरीचा व शासनाचा महसूल बुडविल्याच्या फौजदारी गुन्ह्याला सामोरे जावे लागेल, असा इशाराही मुख्याधिकारी पाटील यांनी दिला आहे. (वार्ताहर)