शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

चौघांना मिळाले आयुष्य

By admin | Updated: June 22, 2016 00:57 IST

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातून दुसऱ्या शहरात मानवी अवयव नेण्याचा आणखी एक प्रयोग मंगळवारी यशस्वी झाला. अपघातात डोक्यास मार लागल्यामुळे ब्रेन डेड झालेल्या

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातून दुसऱ्या शहरात मानवी अवयव नेण्याचा आणखी एक प्रयोग मंगळवारी यशस्वी झाला. अपघातात डोक्यास मार लागल्यामुळे ब्रेन डेड झालेल्या ३२ वर्षीय तरुणाने जाता जाता चौघांना नवे आयुष्य दिले. वैजापूर येथील संतोष गुंड यांना दुचाकीवरून जाताना अपघात झाला. यामध्ये त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी शहरातील युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये १९ जून रोजी रात्री दाखल करण्यात आले. सोमवारी त्यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड जाहीर केले. त्यांच्या नातेवाईकांना अवयवदानाविषयी कल्पना देण्यात आली. अवयवदानातून कोणाचा तरी जीव वाचेल आणि त्यातूनच आपल्या व्यक्तीला पुन्हा पाहता येईल, या भावनेने नातेवाईकांनी अवयवदानास तात्काळ संमती दिली. त्यानंतर अवयव प्रत्यारोपणाची तयारी करण्यात आली. त्यानुसार हृदय मुंबई येथे सकाळच्या जेट एअरवेजच्या विमानाने मुंबईतील फोर्टीस रुग्णालयात, यकृत रुग्णवाहिकेने पुण्यातील सह्याद्री रुग्णालय तर दोन किडन्यांपैकी एक धूत हॉस्पिटल आणि एक कमलनयन बजाज हॉस्पिटल येथील रुग्णांवर प्रत्यारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले.नियोजनाप्रमाणे प्रत्यारोपणासाठी मंगळवारी पहाटे ३ वाजता शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. सकाळी ६.४० वाजता हृदय घेऊन रुग्णवाहिका चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी रवाना झाली. अवघ्या ८ मिनिटांत रुग्णवाहिका विमानतळावर दाखल झाली. ६.५० वाजता विमानाने मुंबईसाठी उड्डाण केले. त्यानंतर सकाळी ७.३० वाजता लिव्हर घेऊन रुग्णवाहिका पुण्यासाठी रवाना झाली. तसेच ८ वाजता एक किडनी घेऊन रुग्णवाहिका बजाज हॉस्पिटलकडे तर एक रुग्णवाहिका धूत हॉस्पिटलकडे रवाना झाली. नियोजित वेळेत, नियोजित ठिकाणी अवयव पोहोचावेत, यासाठी सोमवारी सकाळपासून मंगळवारी दुपारपर्यंत अनेक डॉक्टरांनी प्रयत्न केले. प्रत्यारोपणासाठी युनायटेड सिग्मा हॉस्पिटलचे मुख्य संचालक डॉ.उन्मेष टाकळकर, सीईओ डॉ.अजय रोटे, ‘झेडटीसीसी’चे डॉ. सुधीर कुलकर्णी, डॉ. आनंद देवधर, डॉ. सचिन सोनी, डॉ.अरुण चिंचोले, डॉ. बालाजी आसेगावकर, डॉ. सुजित संचेती, डॉ.विशाल कुटे, डॉ. अशोक पटवर्धन, मनोज भरसाळे, कबीर अहमद, विमानतळाचे निदेशक आलोक वार्ष्णेय आदींनी परिश्रम घेतले.