शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

विविध घटनामध्ये चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:37 IST

जिल्ह्यात विविध घटनामध्ये चौघांचा मृत्यू झाला. यामध्ये त्यात- त्या पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलोकमत चमू : जिल्ह्यात विविध घटनामध्ये चौघांचा मृत्यू झाला. यामध्ये त्यात- त्या पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर शिवारातील एका विहिरीतून पाणी काढताना पाय घसरून पडल्याने तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता घडली. सुरेश नारायण बोनतुले (३०,रा.कळंबा, ता.लोहा ह.मु.शिरडशहापूर ) असे मयताचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक शंकर वाघमोडे, जमादार वाघमारे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. कुरूंदा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात पत्नी, २ मुली, १ मुलगा असा परिवार आहे.तसेच हिंगोली तालुक्यातील वडद येथे विहिरी पडून विविाहितेचा मृत्यू झाला. सुरेखा विष्णू लांडगे (२७) असे मृत महिलेचे नाव आहे. घटनास्थळी पोनि. जगदीश भंडरवार, नंदू मस्के दाखल झाले. याप्रकरणी शंकर बाबाराव पाटील (गायकवाड) यांच्या खबरीवरुन मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोना. नंदकुमार मस्के हे करीत आहेत.तर वसमत येथील रामदास गायकवाड यांना १ सप्टेंबर रोजी सर्पदंश झाला होता. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. प्रकृती खालावल्याने त्यांना नांदेड येथे रेफर केले असता त्यांचा उपचारादरम्यान ५ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव तुकाराम येथे शेतात वानरे हाकण्यासाठी गेलेल्या युवकाचा शॉक लागून मृत्यू झाला. संदीप दिगंबर काळे (२४) असे यूवकाचे नाव आहे. युवकाच्या शेतातून विद्युत तारा गेल्या होत्या.