शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील चार मोठे प्रकल्प मृतसाठ्यातच

By admin | Updated: September 12, 2016 23:24 IST

औरंगाबाद : अपुऱ्या पावसामुळे सलग पाचव्या वर्षीही मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग घोंगावू लागले आहेत. पावसाळ्याचे साडेतीन महिने उलटल्यानंतरही विभागात सरासरीच्या ७२ टक्केच पाऊस झाला आहे.

औरंगाबाद : अपुऱ्या पावसामुळे सलग पाचव्या वर्षीही मराठवाड्यावर दुष्काळाचे ढग घोंगावू लागले आहेत. पावसाळ्याचे साडेतीन महिने उलटल्यानंतरही विभागात सरासरीच्या ७२ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे विभागातील लहान मोठे तलाव, धरणे रिकामीच आहेत. विभागातील अकरा मोठ्या प्रकल्पांपैकी चार प्रकल्प मृतसाठ्यातूनही बाहेर येऊ शकलेले नाहीत. उर्वरित प्रकल्पांमध्ये सरासरी ३४ टक्केच पाणीसाठा आहे. मराठवाड्यात केवळ विष्णूपुरी हा एकच प्रकल्प शंभर टक्के भरला आहे.मराठवाड्यात गेल्या चार वर्षांपासून सातत्याने अपुरा पाऊस पडत आहे. त्यामुळे दरवर्षीच मराठवाडा विभाग दुष्काळात होरपळून निघत आहे. यंदा पावसाने चांगली सुरुवात केली; परंतु महिनाभरापासून पावसाने जवळपास पाठ फिरविली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जलसाठ्यांमध्ये अजूनही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. विभागात लहान, मध्यम आणि मोठे असे मिळून एकूण ८४३ प्रकल्प आहेत. याशिवाय गोदावरी, मांजरा आणि इतर नद्यांवर सुमारे ३९ बंधारे आहेत. या सर्वांची साठवण क्षमता ७२९९ दलघमी आहे. परंतु या धरणांमध्ये आतापर्यंत एकूण २५५० दलघमी म्हणजे ३४ टक्केच पाणीसाठा होऊ शकला आहे. ८२९ लघु प्रकल्पांमध्ये ३२ टक्के आणि ७५ मध्यम प्रकल्पांमध्ये २२ टक्के इतकाच पाणीसाठा आहे. जायकवाडीसह मराठवाड्यात एकूण अकरा मोठे प्रकल्प आहेत. त्यापैकी माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा आणि सिना कोळेगाव हे चार प्रकल्प अजूनही मृतसाठ्यातच आहेत. या धरणांच्या उपयुक्त साठ्यात थोडेही पाणी आलेले नाही. विभागात केवळ नांदेड जिल्ह्यातील विष्णूपुरी हे एकमेव धरण शंभर टक्के भरले आहे. तर निम्न दुधना धरणात ७० टक्के, जायकवाडी धरणात ६४ टक्के, सिद्धेश्वर धरणात ३० टक्के, निम्न मनार धरणात १० टक्के, येलदरी धरणात ११ टक्के जलसाठा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वात कमी पाऊसमराठवाड्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ७२ टक्केच पाऊस झाला आहे. त्यातही उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे केवळ ५२ टक्केच पाऊस झाला आहे. जालना जिल्ह्यात ७७ टक्के, हिंगोली ७२ टक्के, नांदेड ७१ टक्के, लातूर ७० टक्के, औरंगाबाद ६३ टक्के, परभणी ६० टक्के आणि बीड जिल्ह्यांत ५६ टक्केच पाऊस झाला आहे.