शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीपासून संरक्षित चार एकरवरील कापूस अज्ञाताने उपटून फेकला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 11:49 IST

बोंडअळीपासून संरक्षित चार एकरवरील कापूस अज्ञाताने उपटून फेकल्याची खळबळजनक घटना सोयगाव तालुक्यात आज सकाळी उघडकीस आली.

औरंगाबाद :  बोंडअळीपासून संरक्षित चार एकरवरील कापूस अज्ञाताने उपटून फेकल्याची खळबळजनक घटना सोयगाव तालुक्यात आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी शेतकऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

सोयगाव तालुक्यातील कंकराळा गावालगत दिलीप तापेराम पाटील यांची  गट क्रमांक-४९ मध्ये शेती आहे. यामध्ये त्यांनी चार एकरावर कापसाची लागवड केली आहे. मागील वर्षीचा कापसावरील बोंडअळीचा अनुभव पाहता त्यांनी यावर्षी या पिकावर विविध उपाय योजना केल्या. कृषी विभागाच्या आणि कीडरोग सर्वेक्षण सल्ला केंद्रच्या निदान पद्धतीवरून पाटील यांनी पिकाला बोंडअळीपासून मुक्त ठेवले. तालुक्यात सध्या बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढत असताना या पिकाला त्यांनी मेहनतपूर्वक संरक्षित केले. 

मात्र, आज सकाळी पाटील शेतात आले असता त्यांना चार एकरवरील संपूर्ण पिक अज्ञाताने उपटून टाकल्याचे निदर्शंनास आले. यामुळे त्यांची पिकावरील संपूर्ण मेहनत वाया गेली असून मोठा आर्थिक फटका बसला आहे. याप्रकरणी पाटील यांनी सोयगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच घटनेचा पंचनामा करण्यासाठीचे निवेदन सोयगाव तहसील कार्यालयात दिले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. 

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरीagricultureशेती