अंबी : परंडा तालुक्यातील आनाळा येथील एका व्यक्तीचा चा उष्माघाताने मृत्यू झाला़ ही घटना २६ ते ३० एप्रिल दरम्यान घडली असून, या प्रकरणी अंबी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिकतीनुसार आनाळा येथील आदिनाथ दशरथ गोडसे हा इसम २६ ते ३० एप्रिल दरम्यान उन्हात फिरला होता़ उन्हात फिरल्याने त्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती दिलीप आदिनाथ गोडसे यांनी अंबी पोलीस ठाण्यात दिली़ दिलीप गोडसे यांच्या माहितीवरून या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ सदर घटनेचा अधिक तपास सपोफौ शेख हे करीत आहेत़ (वार्ताहर)
उष्माघाताने व्यक्तीचा मृत्यू
By admin | Updated: May 3, 2016 00:16 IST